मनोरंजन

अमोल कोल्हे करणार अमृता खानविलकरशी लग्न?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अभिनेते-खासदार अमोल कोल्हे यांचा सोशल मीडियावर फार मोठा चाहता वर्ग आहे. व्हिडिओजच्या माध्यमातून ते नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. परंतु, सध्या अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यामध्ये अमोल कोल्हे अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत करणार लग्न, असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काय आहे अमोल कोल्हेंची पोस्ट?

अमोल कोल्हे यांनी एका वृत्ताचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये 'राष्ट्रवादीचे खासदार-अभिनेते अमोल कोल्हे पत्नीला कंटाळले आहेत. 'वाजले की बारा' फेम अमृता खानविलकरच्या प्रेमात ते पागल झाले आहेत. लवकरच ते आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन आणि अमृता खानविलकर आपल्या पतीला घटस्फोट देऊन विवाहबद्ध होणार असल्याचे चित्रपटक्षेत्रात बोलले जात आहे. या लग्नाचा माझ्या राजकीय कारकिर्दीवर काहीही परिणाम होणार नाही उलट अमृताशी लग्न करुन मीही उपमुख्यमंत्री होईन कारण अमृता हे नावच लकी आहे राजकारण्यांना असे म्हटले जाते, असे वृत्तात लिहीण्यात आले आहे.

अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये म्हंटले की, हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं. नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती, असा खोचक विधान त्यांनी केले.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल आणि शेठ गोवर्धनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज मुंबई येथून एमबीबीएसची पदवी मिळवली. डिग्री मिळाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी केईएम रुग्णालयात सराव सुरू केला. या दरम्यान त्यांचा परिचय डॉक्टर अश्विनी यांच्याशी झाला आणि पुढील वर्षांमध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांची पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे या मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. अमोल कोल्हे यांना आध्या व रुद्रा अशी दोन मुलं आहेत.

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

टी-२० वर्ल्डकपमध्ये 'इॅम्पॅक्ट प्लेयर'चा नियम नाही, दिग्गज खेळाडू म्हणाला, "कर्णधाराची वेगळी रणनीती..."

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण