Karishma Kapoor Team Lokshahi
मनोरंजन

करिश्मा कपूर पुन्हा लग्न करणार का?

Published by : Akash Kukade

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करिश्मा मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. सध्या करिश्मा तिच्या लग्नाबाबत चर्चेत आली आहे.

करिश्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्याने करिश्माला पुन्हा लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. तर या प्रश्नावर करिश्मा गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करत म्हणाली, विचार करेन, असे उत्तर आल्यामुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आता करिश्माने दिलेल्या या उत्तरामुळे करिश्मा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे का? असा प्रश्न पडला आहे.

करिश्माच्या लग्नाची चर्चा ही आलिया आणि रणबीरच्या लग्नानंतर सुरु झाली होती. करिश्माने त्यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या हातात कलीरा असल्याचे दिसते. तर, पंजाबी लग्नाच्या विधींमध्ये नवरी तिच्या लग्नाच्या बांगड्यांना जोडलेले असे सोन्याचे दागिने घालते. त्यानंतर ती तिच्या बहिणी आणि मैत्रिणींच्या डोक्यावर तिचे हात हलवते आणि जर कलीरा त्यांच्यावर पडला तर तिचं पुढचं लग्न असणार असे म्हटले जाते. त्यामुळे करिश्माच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.

2003 मध्ये करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केले होते. तिला दोनं मुलं असून मुलीचं नाव समायरा आहे तर मुलाचं नाव कियान आहे. २०१६ मध्ये करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट झाला असून ती आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा