TMKOC 
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिका आता होणार बंद? दिग्दर्शक असित मोदीनी अखेर सांगून टाकलं म्हणाले...

गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या घराघरात हसवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. तब्बल १७ वर्षे सुरू असलेल्या या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

Published by : Riddhi Vanne

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Off Air : गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या घराघरात हसवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. तब्बल १७ वर्षे सुरू असलेल्या या मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. जेठालाल, दयाबेन, टप्पू सेना आणि गोकुळधाममधील सगळीच पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

मात्र अलीकडेच ही मालिका लवकरच बंद होणार, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. अखेर या अफवांवर शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना असित मोदी म्हणाले की, ही मालिका अजूनही तितक्याच ताकदीने सुरू आहे. प्रेक्षकांचे प्रेम मिळत राहिले, तोपर्यंत ‘तारक मेहता…’ सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. हा शो फक्त मालिका नसून तो एक ओळख बनला आहे. लोक आजही तो आनंदाने पाहतात, हेच आमच्यासाठी मोठे यश आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, या मालिकेसाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी करू नये, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अजूनही हसवणार आहे.

थोडक्यात

  • गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या घराघरात हसवणारी मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’.

  • ही मालिका तब्बल १७ वर्षे सुरू असून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

  • मालिकेतील पात्रे जसे की जेठालाल, दयाबेन, टप्पू सेना आणि गोकुळधाममधील सगळी पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा