ekta kapoor Team Lokshahi
मनोरंजन

'XXX' सिरीज एकता कपूरला कोर्टाने फटकारले

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी निर्माती एकता कपूरला तिच्या वेब सिरीज 'XXX' मधील "आक्षेपार्ह मजकूर" बद्दल जोरदार फटकारले आणि म्हटले की ती या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहे.

Published by : Sagar Pradhan

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी एकता कपूरला तिच्या वेब सीरिज XXX मधील आक्षेपार्ह सीनसाठी फटकारले आहे. चित्रपट निर्माती आणि टीव्ही क्वीन एकता कपूरने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली आहे. वेब सिरीज 'XXX' मधील "आक्षेपार्ह मजकूर" बद्दल कोर्टाने जोरदार फटकारले आणि म्हटले की ती या देशातील तरुण पिढीचे मन दूषित करत आहे.

कपूरने तिच्या OTT प्लॅटफॉर्म ALTBalaji वर प्रसारित केलेल्या वेब सिरीजमध्ये सैनिकांचा अपमान आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याबद्दल तिच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.

"काहीतरी केले पाहिजे. तुम्ही या देशातील तरुण पिढीचे मन प्रदूषित करत आहात. ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. OTT (ओव्हर द टॉप) कंटेन्ट सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्ही लोकांना कोणत्या प्रकारची निवड देत आहात?. ...उलट तुम्ही तरुणांची मने दूषित करत आहात,” असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.

न्यायालय आवाज नसलेल्यांसाठी काम करते- कोर्ट

यावर कोर्टाने म्हटलं की, तुम्ही लोकांना नेमके कोणत्या प्रकारचे पर्याय देता? तुम्ही प्रत्येक वेळी कोर्टात येता, याचे काही आम्ही कौतुक करत नाही. अशा पद्धतीच्या याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला दंड करु. कोर्टानं म्हटलं की, रोहतगी कृपया हे तुमच्या क्लायंटला कळवा. फक्त तुम्ही एक चांगला वकील घेऊ शकता. हे न्यायालय आवाज नसलेल्यांसाठी काम करते. ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, त्यांना न्याय मिळत नसेल तर विचार करा सामान्य माणसाची अवस्था काय असेल, असं कोर्टानं म्हटलं.

काय आहे प्रकरण?

एकता कपूरच्या ट्रिपल एक्स वेबसीरीजच्या सिझन २ मध्ये सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह सीन दाखविण्यात आले होते. सैन्याचे जवान जेव्हा देशसेवेत असतात तेव्हा त्यांच्या पत्नी घरात परपुरुषांसोबत असतात, असे दाखविण्यात आले आहे. यावरुन माजी सैनिकांच्या वतीने न्यायालयात तक्रार पत्र दाखल करून आक्षेप घेण्यात आला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा