मनोरंजन

‘यारी दोस्ती’ चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला!

Published by : Lokshahi News

मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा ट्रेंड सध्या चर्चेत आहे. 'टाईमपास 2', त्यानंतर आता 'टकाटक 2', 'भेटली तू पुन्हा 2'हे चित्रपटांचा सिक्वल आले. आता 'यारी दोस्ती – 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दोस्तीतील पैलू मांडणाऱ्या यारी दोस्ती या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले आहे. यारी दोस्तीला युट्यूब वर 8.2 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.या चित्रपटाच्या यशानंतर निर्मात्यांनी आता सिक्वलची घोषणा केली आहे.

पॅशनवर्ल्ड आणि बुद्ध टेलिफिल्म्स निर्मिती चित्रपटाची सहनिर्माती ऑडीओ लॅब मिडीया कोर्पोरेशन करत आहे.सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करत निर्मात्यांनी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शंतनू अनंत तांबे करत आहे.अभिनेता हंसराज जगताप,आकाश वाघमोडे,सुमित भोस्के, आशिष गाडे,संदीप गायकवाड,शिल्पा ठाकरे,संकेत हेगणा आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर