Yami Gautam Team Lokshahi
मनोरंजन

Yami Gautam : पतीसोबत यामीने केली नैना देवीची पूजा , पोस्ट झाली व्हायरल....

यामीने लिहिले की तिला तिच्या देव भूमी हिमाचलमध्ये नयना देवीचे आशीर्वाद आम्हाला मिळालेलं आहे.

Published by : prashantpawar1

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री म्हणून नामांकित असणारी यामी गौतम(Yami Gautam) सध्या हिमाचल प्रदेशमध्ये तिच्या मूळ गावी आहे. आणि ती आपल्या कुटुंबियांसोबत तिथे आनंदी वेळ घालवत आहे. तिला पाठिंबा देण्यासाठी त्यांचे पती आदित्य धरही तिथे पोहोचले आहेत. नुकतच या दोघांनी तिथल्या प्रसिद्ध नैना देवी मंदिराला भेट दिली आणि पूजेची छायाचित्रेही शेअर केली जी तुमच्यासमोर आहेत. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत यामीने लिहिले की तिला तिच्या देव भूमी हिमाचलमध्ये नयना देवीचे आशीर्वाद आम्हाला मिळालेलं आहे. चित्रामध्ये यामी गुलाबी रंगाच्या नक्षीदार सलवार-सूटमध्ये खूपच गोंडस दिसत आहे. तिचा पारंपरिक लूक चाहत्यांना खूप आवडतोच. तर दुसरीकडे तिचा पती आदित्यबद्दल बोलायचे झाले तर त्याने पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमासोबत काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते.

Yami Gautam

दोघेही पूर्ण भक्तिभावाने नयना देवीचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत. चित्रांमध्ये पंडितजी पूर्ण विधीपूर्वक प्रार्थना करताना दिसत आहेत. यामी आणि आदित्यने मंदिराच्या प्रांगणात आपल्या गोंडस हास्याने पोज दिली.

यामी गौतम आणि आदित्य धर यांनी जून २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघेही आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेताना दिसत आहेत. दरम्यान वर्क फ्रंटवर यामी पुढे अक्षय कुमार(Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी(Pankaj Tripathi) यांच्यासोबत 'OMG 2' मध्ये दिसणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा