Shiv Thakare Team Lokshahi
मनोरंजन

बिग बॉस’च्या घरात शिव ठाकरेला तरुणीने घातली लग्नाची मागणी

बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो सध्या खुप चर्चेत आहे. शिव ठाकरे हा हिंदी बिग बॉस सीझन १६ मध्ये सहभागी झाला आहे.

Published by : shweta walge

बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो सध्या खुप चर्चेत आहे. शिव ठाकरे हा हिंदी बिग बॉस सीझन १६ मध्ये सहभागी झाला आहे. या कार्यक्रमात पहिल्या दिवसांपासूनच शिवने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपासून शिव ठाकरेच्या लव्ह लाईफबद्दल बिग बॉसमध्ये चर्चा होताना दिसल्या. त्यातच आता शिव ठाकरेला एका मुलीने लग्नाची मागणी घालणारं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी ख्रिसमस स्पेशल भाग प्रदर्शित करण्यात आला. यावेळी अभिनेता शेखर सुमन यांनी बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बिग बॉसमधील स्पर्धकांना त्यांच्यासाठी आलेली काही मजेशीर पत्र वाचून दाखवली. शिव ठाकरेला एका मुलीने लग्नाची मागणी घालणारं पत्र आले होते.या पत्राला अगदी नवरीप्रमाणे सजवण्यात आले होते.

“प्रिय प्राणनाथ, तू बिग बॉसच्या घरात खूप साऱ्या मुली पाहिल्या असशील. पण मी तुला विश्वास देते की माझ्याइतकी संस्कारी मुलगी तुला शोधूनही सापडणार नाही. मी तुला टीनासारखी कधीही उलट उत्तर देणार नाही. तसंच मी सुमबुलसारखं सगळं काही निमूटपणे सहन करेन. मी कठीण प्रसंगातही तुझ्याबरोबर उभी राहिन. पण मी साजिद खानवर खूप नाराज आहे कारण तू आजकाल साजिदच्या खूपच जवळ जात आहे. का कुणास ठाऊक पण मला साजिदमध्ये माझी सवत दिसू लागली आहे. लग्नानंतर हे सगळं चालणार नाही”, असे त्यात लिहिले आहे.

शेखर सुमननने टास्क दरम्यान अनेक सदस्यांची पत्र वाचून दाखवली. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान बिग बॉस हिंदीच्या १६ व्या पर्वात शिव ठाकरे हे नाव सातत्याने चर्चेत आहे. या नावाची चर्चा ही सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...