Dhanashree Verma  Team Lokshahi
मनोरंजन

युजवेंद्र चहलच्या पत्नीला डान्स करताना झाली होती दुखापत; शस्त्रक्रिया झाली यशस्वी

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by : shamal ghanekar

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची (yuzvendra chahal) पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धनश्रीच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार घेताना दिसत आहे. धनश्री वर्माच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे.

धनश्रीचा एका डान्स सेशनदरम्यान पाय मुरगळला त्यामुळे तिच्या एका लिगामेंटला जबर दुखापत झाली. त्यानंतर धनश्रीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. धनश्री लवकरच डान्स करतानाही दिसणार आहे. धनश्रीने नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून त्या व्हिडिओमध्ये तिची आतापर्यंतची जर्नी पाहिला मिळत आहे.या व्हिडिओमध्ये धनश्रीवर सुरू असलेली शस्त्रक्रिया आणि त्यानंतर धनश्रीने दिलेली प्रक्रिया दिसत आहे.

धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. धनश्री तिच्या इंन्स्टाग्राम आकांऊटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आणि तिने शेअर केलेल्या फोटोंना आणि व्हिडिओंना चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत असतात. तसेच याआधी धनश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन चहल हे आडनाव हटवले होते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना चांगलेच उधाण आले होते. त्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्रीने त्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक असल्याचे सांगितले आणि त्यांनी या सर्व चर्चांना पुर्णविराम दिला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा