टेलिव्हिजन

Ashok Saraf: महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा लवकरच येणार टेलिव्हिजनवर; “या” मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राचे महानायक ज्यांनी स्वतःची "मी बहूरुपी" अशी ओळख निर्माण केली असे सर्वांचे लाडके अशोक मामा आता कलर्स मराठीवरील एका मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्राचे महानायक ज्यांनी स्वतःची "मी बहूरुपी" अशी ओळख निर्माण केली असे सर्वांचे लाडके अशोक मामा आता कलर्स मराठीवरील एका मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लाखोंच्या संख्येने अशोक सराफ यांचा चाहतावर्ग पाहायला मिळतो. अशोक सराफ हे मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलााकर असून हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशोक सराफ हे हुरहुन्नरी असे व्यक्तिमत्व आहेत. चित्रपटांसोबतच अशोक सराफ यांनी नाटकांचे प्रयोग देखील केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या आजवरच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तर नुकतेच ते "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटात टिसीच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

आता अशोक सराफ कलर्स मराठीवर त्यांच्या अनोख्या अंदाजासह चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. हम पांच, नाना ओ नाना, टन टना टन या मालिकांनंतर अशोक सराफ पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहेत. या मालिकेची कथा चिन्मय मांडलेकर यांच्या कल्पनेतून लिहली गेली आहे. तर या मालिकेचा प्रोमो पाहता एक गोष्ट समोर आली आहे की, अशोक सराफ यांचे पात्र थोडं शिस्तीचं आहे मात्र त्यांचे मिश्कील व्यक्तिमत्व या पात्रात देखील पाहायला मिळणार आहे. तर प्रोमोमध्ये दाखवल्या प्रमाणे अशोक सराफ यांच नाव अशोक मा.मा असं काहीस असल्याचा अंदाज लावला जात आहे.

यासंबंधीत कलर्स मराठीने या सिरियलच्या प्रोमोची पोस्ट शेअर करताना कॅप्शन मध्ये लिहलं आहे, "महाराष्ट्राचा महानायक टेलिव्हिजनवर परतला आहे. तो चुकीच्या गोष्टींना योग्य करणार, सगळ्यांना शिस्त लावणार, आणि आपल्या कमाल परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क करणार! मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्यांचे लाडके मामा लवकरच येत आहेत". त्याचसोबत लेखक चिन्मय मांडलेकर यांनी देखील त्यांच्या सोशल मीडियावर या सिरियलची पोस्ट शेअर केली आहे आणि ते कॅप्शन देत म्हणाले की, "माझ्यासाठी माझी लेखक म्हणून ही नवीन मलिका खूप खास आहे. कारण यातला माणूस खास आहे. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ!"

तर अशोक सराफ यांच्या नव्या मालिकेसाठी प्रेक्षांची उत्सुकता शिगेला पोहचलेली पाहायला मिळत आहे. या पोस्टवर कमेंट करत प्रेक्षक आणि अशोक सराफ यांचा चाहतावर्ग म्हणाले, "अशोक मामांना अशा वेगळ्या भूमिकेत बघण्याची पर्वणी मिळणार.. या वयात ही हा उत्साह उल्लेखनीय आहे.. खूप काही शिकण्यासारखं आहे मामांकडून, नावच पुरेस आहे, या कंटाळवाण्या सिरीयल पासुन सुटका मिळण्यासाठी अशोक सराफ सर तुम्ही लवकर या काहितरी नवीन नक्कीच असणार वाट बघतो आहोत". यावरून अशोक सराफ यांच्या या मालिकेची उत्सुकता लागलेली असून त्यांचे पात्र आणि त्यातून कशाप्रकारे प्रेक्षकांचे मनोरंजन होणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. मात्र या मालिकेतून सुद्धा अशोक सराफ आपली उत्तम कामगिरी बजावताना दिसणार आहेत हे नक्की.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा