सिनेमा

Akshay Kumar Movie: स्त्री 2-भूल भुलैया 3 नंतर अक्षयचा धमाका! खिलाडीचा 'भूत बंगला' येणार "या" दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

'स्त्री 2-भूल भुलैया 3' नंतर अक्षय कुमारचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खिलाडीचा 'भूत बंगला' या दिवशी प्रदर्शित होणार. जाणून घ्या अधिक!

Published by : Team Lokshahi

2024 मध्ये अनेक हॉरकॉम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ज्यामध्ये स्त्री2 आणि भूल भुलैया 3 हे बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर राज्य करणारे चित्रपट ठरले आहेत. या दोन चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केल्याच पाहायला मिळालं आहे. अशातच आता अक्षय कुमारने देखील त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

अक्षय कुमार नुकताच सिंघम रिर्टन या चित्रपटात त्याच्या डॅशिंग अंदाजासह पाहायला मिळाला आहे. आता अक्षय त्याच्या 'भूत बंगला' या हॉरकॉम चित्रपटासह 2 एप्रिल 2026ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि केप ऑफ गुड फिल्म्स संयुक्तपणे या चित्राची निर्मिती करत आहेत. मात्र तरीही या चित्रपटासाठी प्रेक्षकांना अजून वर्षभराची प्रतिक्षा करावी लागणार.

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या 'भूत बंगला' या चित्रपटाची माहिती दिली आहे. अक्षय कुमारने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो पांढरा धोतर-कुर्ता आणि वर थ्री-पीस जॅकेट घातलेला दिसत आहे, त्याने हातात दिवा देखील धरला आहे. तसेच या चित्रपटामुळे अक्षय पुन्हा त्याच्या आवडीचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत 14 वर्षांनंतर एकत्र काम करणार आहे.

त्याने पोस्ट शेअर करत चित्रपटाची शूटिंग डेट सांगितली आहे, यादरम्यान 10 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून 'भूत बांगला' या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. अक्षयने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, माझ्या आवडत्यासोबत सेटवर येण्यासाठी उत्सुक आहे... प्रियदर्शन आज आम्ही आमच्या हॉरर कॉमेडी भूत बांगलाचे शूट सुरु करत आहोत . हा भय आणि हास्याचा डबल डोस तुमच्यासाठी तयार आहे 2 एप्रिल 2026ला! तोपर्यंत तुमच्या शुभेच्छा पाहिजे.....

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shidne : पुण्यात 'जय गुजरात' घोषणेवरून वाद; शिंदे गटाचं स्पष्टीकरण आलं समोर

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून