सिनेमा

Devendra Fadnvis on Dharmveer 2 | CM Shinde यांच्या बंडाची कथा चित्रपटात दिसणार? फडणवीस काय म्हणाले?

धर्मवीर 2 मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा चित्रपटात दिसणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

Published by : Team Lokshahi

धर्मवीर 2 मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित झाला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा चित्रपटात दिसणार का? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. सिनेमाच्या उत्तरार्धात खरेखुरे मुख्यमंत्री पडद्यावर दिसलेले आहेत. धर्मवीर 2 या चित्रपटामुळे महाराष्ट्रात आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लवकरचं आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तर मनोरंजन विश्वातही राजकीय वारा वाहू लागत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःची व्यक्तिरेखा साकारलेली आहे. तर धर्मवीर 2 हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे.

याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याप्रकारे धर्मवीर 1 ला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अतिशय मनापासून लोकांनी तो सिनेमा पाहिला, तशाच प्रकारे आता धर्मवीर 2 हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल कारण, सत्य कथेवर आधारीत आणि ज्या लोकांच जीवन आपण बघितलं आहे, अनुभवलेलं आहे, ऐकलं आहे किंवा वाचलं आहे अशा चरित्रनायकांच्या संदर्भातला हा चित्रपट असल्यामुळे निश्चतपणे तो सगळ्यांना आवडेल. तसेच पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याच्या पुढचा जो धर्मवीर 3 येईल त्याची पटकथा मी लिहेन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा