गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत वाढ होत आहे. शनिवारी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देशभर वाढल्या. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती प्रतिलीटर 102 रुपये 14 पैसे झाली आहे. भारतीय तेल वितरक कंपन्यांनी रविवारी 3 ऑक्टोबर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली.
पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंधनाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे. तर डिझेलची किंमत 2.09 रुपयांनी वाढली आहे.