Vidhansabha Election Result

Fadnavis on Vidhansabha Result: बावनकुळेंच्या अध्यक्षतेमुळे पक्ष जिवंत राहिला - फडणवीस

फडणवीस म्हणाले की बावनकुळेंच्या अध्यक्षतेमुळे पक्ष जिवंत राहिला आहे, विधानसभेच्या निकालावर प्रतिक्रिया देताना.

Published by : Dhanshree Shintre

विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान भाजप आणि महायुती आघाडीवर पाहायला मिळत आहे.

याचपार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समुद्र 2022 लाच परत आला आहे. मला आता असं वाटतं आहे की आम्ही मिळुन आता सरकार स्थापन करणार आहोत त्याच्यामुळे आता जास्त शेरो शायऱ्या करण्याची गरज नाही. एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात गेल्या 2 वर्षात पार्टीने खालपर्यत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पुर्ण पार्टी जिवंत झाली. पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली. त्यामुळे मी बावनकुळे आणि आमच्या पक्षाचे आभार मानतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा