Headline

संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करा-सचीन खरात

Published by : Lokshahi News

रुपाली बडवे | संभाजी भिडे यांनी भारत देशाबद्दल अत्यंत चुकिचे विधान केले आहे. या विधानाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष निषेध करत असून सचीन खरात म्हणाले भाजपा पक्ष प्रत्येक वेळेस बोलतो,प्रतिक्रीया देत असतात. प्रथम देश नंतर पक्ष मग आता संभाजी भिडे यांनी भारत देशाविषयी जे वक्तव्य केलं आहे यावर मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस हे का गप्प आहेत यांनी भूमिका जाहीर करावी तसेच कन्हैया कुमार यांना टुकडे टुकडे गँग म्हणत असतात मग आता संभाजी भिडे यांना कोणती गँग म्हणणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी सचीन खरात महाविकासआघाडी सरकारला करत आहेत.

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. संभाजी भिडेंनी सांगलीत बोलताना म्हटले आहे की, आपला देश जगात क्रमांक दोनची लोकसंख्या असलेला देश, मग आपला क्रमांक एक नंबर कधी येणार. आपण तो क्रमांक एक मिळवला आहे. कुठल्या गोष्टीत आपल्याला जमले नाही त्या गोष्टीत चीन पुढे आहे, जो आपला कट्टर दुश्मन मारेकरी आहे, पण हिंदूना मेंदू असतो. आपला क्रमांक यात एक आहे, तो म्हणजे निर्लज्जपणात. जगात 187 देश आहेत. त्या देशात बेशरमपणाचा हा देश आहे. आपल्या लाज वाटत नाही. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असल्याचे संभाजी भिडे म्हणाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर