India

Financial Session of Parliament : काँग्रेस ‘टुकडे टुकडे गँग’ची लीडर बनलीय – नरेंद्र मोदी

Published by : Lokshahi News

लोकसभेत (Loksabha) आज केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेत भाषण केलं. या भाषणावर विरोधी पक्षाने आपलं मत मांडलं. आज या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणातून मोदींनी काँग्रेस (congress) आणि आम आदमी पार्टीवर जोरदार निशाणा साधला.

यावेळी काँग्रेस कायमच द्वेष करत आली आहे. विभाजनवादी मानसिकता काँग्रेसच्या DNA मध्ये घुसली आहे. इंग्रज निघून गेले, 'तोडा आणि राज्य करा' या नीतीला काँग्रेसने आपले चरित्र बनवले आहे. काँग्रेस तुकडे तुकडे गँगची लीडर बनली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी Live

  • आम्ही गरीब कामगारांसाठी २ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला : मोदी
  • नेहरूंना महागाईवर लाल किल्ल्यावरून भाषण करताना हात वर करावे लागले होते : मोदी
  • आज नेहरूच नेहरू असणार, तुमचे नेताही म्हणतील मजा आली : मोदी
  • काँग्रेस काळात १० टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा दर, २०१४ नंतर ५ टक्के : मोदी
  • काँग्रेसच्या काळात शेवटच्या ५ वर्षात महागाईचा आकडा दोन अंकापर्यंत पोहचला : मोदी
  • काँग्रेसच्या वागण्याने मीच नाही पूर्ण देश अचंबित आहे. काँग्रेसची लोकं ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे त्यावरून त्यांनी ठरवलेलं दिसतं की पुढील १०० वर्षे तरी सत्तेत यायचं नाही.
  • जगातील लोकांकडून भारताची बदनामी करणाऱ्या अशा गोष्टी बोलवून घेतल्या : मोदी
  • देशातील अनेक राज्यांनी काँग्रेसला मागील मोठ्या काळापासून नाकारलं : मोदी
  • काँग्रेस जमिनीपासून दूर लोटलेला पक्ष
  • तुम्ही फाईलीत हवला, आम्ही लाईफ बदलतोय
  • आत्ता वेळेनुसार बदल घडवावा लागेल
  • अजूनही काही लोक गुलामीच्या मानसिकतेत
  • काँग्रेसच्या काळात अपूर्ण योजना आम्ही पूर्ण केल्या
  • महालात राहणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा कळणार नाहीत
  • छोट्या शेतकऱ्यांविरोधत काँग्रेसला तिरस्कार का आहे?
  • भारतात शेतकऱ्यांवर वाईट वेळ येऊ दिली नाही
  • भारताने कोरोनातही मोठे निर्णय घेतले
  • खतांची आयात वाढवली आहे
  • विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या भाषणावर आक्षेप
  • लॉकडाउनमध्ये काँग्रेसच्या लोकांनी कामगारांना तिकीट काढून घरी पाठवलं : मोदी
  • मानव जातीवर संकट आलं असतांना हे कसं वागणं आहे : मोदी
  • करोना काळात काँग्रेसने मर्यादा गाठली होती : मोदी
  • तामिळनाडूत तुम्हाला साठ वर्षे संधी मिळाली नाही
  • तेलंगणा बनवला तुम्ही त्यांनीही तुम्हा मतं दिली नाहीत
  • काँग्रेसला देश एवढी वर्षे सत्तेत राहूनही का नाकारत आहे
  • एवढ्यावेळा हार पत्करून विरोधकांचा अहंकार जाईना
  • 50 वर्षे तुम्ही देशात सत्तेत होता हे विसरू नका
  • अनेक राज्यात तीन दशकांपासून काँग्रेसला कुणी उभं केलं नाही
  • काँग्रेसची हालत खराब आहे
  • सरकारने बनवलेली प्रत्येक योजन थेट लोकांपर्यंत
  • गरिबांची बँक खाली झाली
  • तुम्ही लोकांमध्ये राहिला असता तर दिसलं असतं
  • विरोधकांना मोदींचा टोला
  • अनेकजण अजून मागेच अडकून राहिले आहेत
  • देशाच्या जनतेने तुम्हाला ओळखलं आहे
  • चुलीच्या धुरापासून माता भगिनींची मुक्तता झाली
  • घराघरात गॅस योजना पोहोचली
  • आज गरिबांची घर पण लाखो रुपयांची झाली आहेत
  • देशाने पायाभूत सुविधेत विकास केला आहे
  • कोरोना काळानंतर जग वेगळ्या पद्धतीने पुढं जात आहे
  • ही संधी भारताने सोडली नाही पाहिजेत, भारताने स्वतःला कमी लेखता कामा नये – पंतप्रधान
  • नव्या संकल्पना घेऊन, देश स्वातंत्र्य ची 75 वर्ष पूर्ण करताना देश पुढं जातोय
  • गेल्या वर्षात देशाने अनेक क्षेत्रात नाव मिळवले
  • लतादीदींचे भारतात मोठे योगदान आहे. देशाने आदरणीय लतादीदींना गमावले. देशाला लतादीदींच्या आवाजाने प्रेरणा दिली आहे.- पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत लतादीदींना श्रद्धांजली वाहली

रवीवारी लता दिदींचा मृत्यू झाला. अनेक वर्ष देशाला मोहीत केलं. प्रेरीत केलं आणि भानेनं भरलं. त्यांनी ३६ भाषेत गाणं गायलं. त्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या देशाची एकता कायम ठेवली. अखंड भारतासाठी त्यांची गाणी प्रेरणादायी होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात बदल झाला. एक नवा वर्ड ऑर्डर आलं त्यात आपण जगत आहोत. कोरोना काळानंतर जग एका नव्या वर्ड ऑर्डरकडे नव्या व्यवस्थेकडे वेगाने जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी

11th Addmission Date Extend : अकरावी प्रवेशासाठी मुदतवाढ; आता 'या' तारेखपर्यंत घेता येणार प्रवेश