सेलिब्रिटी बाप्पा

Ganesh Chaturthi 2024 Shiv Thackrey: कमरेला ढोल अन् अमरावतीत शिव ठाकरेंच्या घरी वाजत गाजत बाप्पांचे आगमन

शिव ठाकरे यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

Published by : Team Lokshahi

आज प्रत्येकासाठी फार आनंदाचा दिवस आहे. आज धरतीवर तसेच जगभरात लाडक्या गणरायाने आगमन केले आहे. सुखकर्ता आणि दु:खहर्ता ज्याला बोललं जात असा जो बुद्धीचा दाता आहे त्या गणरायाची आज जगभरात प्रत्येक ठिकाणी मोठ्या जल्लोषात आगमन करण्यात आलेलं आहे. अनेक राजकीय लोकांसोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील आपल्या घरी बाप्पाचे आगमन केले आहे. प्रत्येकाने मोठ्या उत्साहात बाप्पाला आपल्या घरी आणलं आहे. वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या नगाड्यात बाप्पाची मिरवणूक घरापर्यंत आणली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस वातावरण हे आनंदमय आणि पावित्र्याचे असणार आहे. बाप्पाचे आगमन हे प्रत्येकाला दुखातून सुखात नेनारे आहे.

प्रत्येकाने मोठ्या उत्साहात बाप्पाला आपल्या घरी आणलं आहे. वाजत गाजत आणि ढोल ताशाच्या नगाड्यात बाप्पाची मिरवणूक घरापर्यंत आणली आहे. आजपासून पुढचे 10 दिवस वातावरण हे आनंदमय आणि पावित्र्याचे असणार आहे. बाप्पाचे आगमन हे प्रत्येकाला दुखातून सुखात नेनारे आहे. अशातच बिग बॉस 16 चा स्पर्धक आणि अभिनेता विदर्भकर अमरावती येथील शिव ठाकरे यांच्या अमरावतीच्या निवासस्थानी मोठ्या जल्लोषात ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.

यावेळी कमरेला ढोल बांधत शिव ठाकरे यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला,यावेळी शिव ठाकरेने भन्नाट असा डान्स करत बाप्पाचं स्वागत आपल्या घरी केल आहे. डोक्याला फेटा आणि पारंपारिक पोशाखात शिव ठाकरेने बाप्पाला आपल्या घरात आणल आहे. बाप्पाची मुर्ती देखील देखणी आणि फार सुंदर आहे. अगदी मोठ्या आनंदात शिव ठाकरे यांनी आपल्या घरी बाप्पाला विराजमान केल आहे. आता 10 दिवस मनोभावे शिव ठाकरे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ghashiram Kotwal : 'घाशीराम कोतवाल' हिंदी रंगभूमीवर; ज्येष्ठ हिंदी अभिनेते संजय मिश्रा साकारणार मध्यवर्ती भूमिका

Gold Rate : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीदारांना होणार फायदा

Impact of US Tarrif On Share Market : भारतीय शेअर बाजार हादरला, पण सेन्सेक्स निफ्टीत तेजी

WCL 2025 Semifinal : क्रिकेटपेक्षा राष्ट्र प्रथम! भारताचा पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय