साताऱ्यात गणपतीचं आगमन झाल्यानंतर आता गौरीच्या आगमनाच्या तयारीसाठी भाविक लागले आहे. गौरी सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठात भाविकांनी गर्दी केलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे ग्राहकांचा वाढता प्रतिसाद असून सजावटीच्या साहित्यांमध्ये वेगवेगळ्या वरायटीज देखील पाहायला मिळत आहेत.
गौरीच्या आगमनादरम्यान बाजारपेठ हे खुललेले पाहायला मिळत आहेत. ज्याप्रकारे बाप्पाच्या आगमनासाठी अनेक ठिकाणची बाजारपेठ ही भरलेली पाहायला मिळत होती त्याचप्रमाणे आता गौरीच्या आगमनासाठी देखील बाजारपेठात अनेक सजावटीच्या वस्तू पाहण्यासाठी बाजारपेठ भरलेले पाहायला मिळत आहेत.