India

Goa Election Results : पणजीतून उत्पल पर्रिकरांचा 800 मतांनी पराभव

Published by : Pankaj Prabhakar Rane

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर ( Utpal Parrikar) यांना पराभवाचा धक्का बसला आहे. केवळ 800 मतांनी त्यांना आपली जागा गमवावी लागली आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मॉन्सेरात हे विजयी झाले आहेत. उत्पल पर्रिकर यांनी त्यांना जोरदार टक्कर दिली.

भाजपने उमेदवारी नाकारल्याने उत्पल पर्रिकर यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. त्यांची मनधरणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली. पणजीतून उत्पल पर्रिकर यांची आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजप विरुद्ध माजी मुख्यमंत्री यांचा मुलगा असा सामना होता. यात कोण बाजी मारणार याची मोठी उत्सुकता होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस