गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत सोन्याच्या दरात किंचित वाढ होताना दिसली. शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर 47070 रुपये इतका होता. शनिवारी हा दर अवघ्या 10 रुपयांनी वाढून 47080 रुपये इतका झाला. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रतितोळा दर 47,451 रुपये इतका होता. तो आठवड्याच्या शेवटापर्यंत 46,793 रुपयांच्या पातळीवर आला होता. त्यामुळे आठवडाभरात सोनं 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
तर दुसरीकडे शनिवारी चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव 64,150 रुपये प्रतिकिलो या पातळीवर येऊन पोहोचला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी एका किलो चांदीसाठी 65,261 रुपये मोजावे लागत होते.