जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमत 253 रुपयांनी महागल्यात, तर दुसरीकडे चांदीची किंमत 61 रुपयांनी घसरली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा दर दहा ग्रॅम 47,100 रुपयांवर बंद झाला. मागील व्यापार सत्रात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 46,847 रुपये होती.
आज चांदीचा दर 61 रुपयांनी घसरून 65,730 रुपये प्रतिकिलो होता, मागील व्यापार सत्रात चांदीची किंमत 65,791 रुपये प्रति किलो होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आणि चांदीवरही दबाव पाहायला मिळाला. यावेळी सोने 0.41 टक्क्यांनी वाढून 1,816.70 डॉलर प्रति औंसच्या पातळीवर होते, चांदी लाल निशाणीत प्रति औंस 25.135 च्या पातळीवर होती. औंसमध्ये 28.34 ग्रॅम आहेत.