सोने – चांदीच्या दरात चढउतार होताना दिसत असतो. आजसुद्धा महाराष्ट्रात सोने – चांदीच्या दरात किंचित घसरण झालेली पाहायला मिळते आहे.
मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,२५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,१०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,१०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,२५० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१६ रुपये आहे.
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच बंद झाली होती.