India

Google Doodles | लुडविग गुटमन यांना अनोखी आदरांजली

Published by : Lokshahi News

आपल्याला महापुरुषांची जन्मतारीख माहीत नसेल तर आपण गुगलवर जाऊन शोधत असतो. मग गुगल अशा महापुरुषांना कसा विसरेल. आज आपण गुगल पाहिले तर गुगलच्या डूडलवर कोणाचे तरी व्यंगचित्र दिसेल, तर ते आहेत न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन. न्यूरोलॉजिस्ट लुडविग गुटमन यांचा आज १२२ वा जन्मदिवस आहे. याबद्दल गुगलने हे खास डूडल तयार केले आणि त्यांच्या जन्मदिवसाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली.

३ जुलै १८९९ रोजी जन्मलेल्या लुडविग गुट्टमॅन यांचा जन्म टोस्ट जर्मन साम्राज्य म्हणजे आजच्या पोलंड शहरामध्ये झाला. १९३३ मध्ये ते एक न्यूरोसर्जन म्हणून काम करू लागले होते. लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, २९ जुलै १९४८ रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटलमध्ये युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. या सर्वांनी व्हीलचेअर्समध्ये भाग घेतला होता. आपल्या रुग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी गुट्टमन या 'पॅराप्लेजिक गेम्स' हा शब्द वापरायला सुरुवात केली. त्यानंतर हा 'पॅरालंपिक खेळ' म्हणून ओळखला जाऊ लागला. गुट्टमॅन यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 'सर थॉमस फेर्नली चषक' देऊन सन्मानित केले.

१९६० साली रोममध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकसोबतच 'आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स'चे आयोजन केले गेले. हा ९ वा वार्षिक आंतरराष्ट्रीय स्टोक मॅंडेविले गेम्स म्हणून ओळखला जातो. त्यांनी १९६१ मध्ये British Sports Association for the Disabled ची स्थापना केली. ऑक्टोबर १९७९ मध्ये गुट्टमॅन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि वयाच्या 80 व्या वर्षी १८ मार्च १९८0 रोजी त्यांचे निधन झाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा