(Tractor Anudan Yojana ) ट्रॅक्टर अनुदान योजना 2025 ही राज्यातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रुपयांपर्यंत 90 टक्के अनुदान मिळू शकते. योजनेचा मुख्य उद्देश शेतीतील यांत्रिकीकरणाला चालना देऊन उत्पादनक्षमता वाढवणे, मजुरांवरील अवलंबित्व कमी करणे आणि शेती अधिक फायदेशीर बनवणे हा आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in यावर जाऊन आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला (लागू असल्यास) ही कागदपत्रे लागतात. अर्जदार हा भारतीय नागरिक असावा, त्याच्याकडे किमान 2 हेक्टर शेती असावी, तो बचत गटाचा सदस्य असावा आणि बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
कोणत्या यंत्रांवर अनुदान मिळू शकते?
या योजनेअंतर्गत खालील शेतीसंबंधित यंत्रसामग्रीसाठी अनुदान दिले जाईल:
ट्रॅक्टर
पॉवर टिलर
ट्रॅक्टर व पॉवर टिलर चालित अवजारे
बैल व मनुष्य चालित शेती अवजारे
काढणीनंतर प्रक्रिया यंत्रे
फलोत्पादन यंत्र
विशेष प्रकारची आधुनिक शेती उपकरणे
स्वयं-चालित यंत्र
योजनेचे मुख्य फायदे
•ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी 90% सबसिडीमुळे आर्थिक भार कमी होईल
•शेतीतील कामे अधिक जलद व कार्यक्षम पद्धतीने पार पडतात
•मजुरीवरील खर्चात मोठी बचत होते
•उत्पादनक्षमता वाढते व नफा वाढतो
•शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य होतो
•कर्जाचा बोजा कमी होतो, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन वाढते