प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं शहरी भागातील ईडब्ल्यूएस आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यासाठी या योजनेला 9 ऑगस्ट 2024 रोजी मान्यता दिली.
प्रधानमंत्री आवास योजना ही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी परवडणारे घरांचे पर्याय उपलब्ध करण्याच्या उद्देशानं गृहनिर्माण योजना आहे. या योजनेत 1 कोटी नवीन घरे बांधली जाणार असून ज्यापैकी प्रत्येकाला 2.30 लाख रुपयांचे आर्थिक अनुदान मिळेल अशी माहिती मिळत आहे.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानुसार पीएमएवाय-शहरी च्या मागील टप्प्यात 1.18 लाख घरे मंजूर करण्यात आली होती, ज्यापैकी 8.55 लाखांहून अधिक घरे पूर्ण झाली आहेत. नवीन घरांसाठी अर्ज भरण्यासाठी आता सुरुवात झाली असून नवीन घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करता येईल?
प्रथम PMAY वेबसाइटवर लॉगिन करा.
“पीएमएवाय-यू 2.0 साठी अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
सूचना काळजीपूर्वक वाचा.
वार्षिक उत्पन्न आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करून पात्रता तपासा
तुमचा आधार तपशील प्रविष्ठ करा
आधार पडताळणी करा
नोंदणी फॉर्ममध्ये तुमचं नाव, पत्ता, उत्पन्न तपशील आणि इतर माहिती व्यवस्थित भरा.
फॉर्म सबमिट करा आणि अर्ज स्विकारला जाण्याची प्रतिक्षा करा.
आवश्यक कागदपत्रं कोणती
ओळखपत्र (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र)
आधार कार्ड
रहिवाशी प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक तपशील
पासपोर्ट आकाराचा फोटो