IPL च्या 15 व्या हंगामाला आता सुरूवात झाली असून सामन्यांची रंगत आता चांगलीच वाढू लागली आहे. यंदाच्या हंगामातील 3 सामने पार पडले आहेत आजची (28-03-2022) लढत मात्र काहीशी खास असणार आहे. ही लढत खास असण्याचं कारण म्हणजे, आजचा सामना हा लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध गुजरात टायटन्स असा असणार आहे. दरम्यान, हे दोन्ही संघ यंदाच्या हंगामात IPL मध्ये नव्याने सामील झालेले संघ आहेत.
सामना सुरू झाला असून, गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहोम्मद शमीच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर लखनौचा कर्णधार के एल राहूल बाद झाला. त्यानंनतर अगदी तिसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार खेचल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर क्विंटन डी कॉक बाद झाला. शमीने डी कॉकला त्रिफळा उडवून बाद केले. ह्यानंतरही गुजरातच्या गोलंदाजांनी सामन्यावरील पकड कायम ठेवली. शमीने मनिष पांडेला तर वरूण एरोनने एविन लूईसला बाद करत लखनौच्या फलंदाजांवरील दडपण कायम ठेवलं. त्यामुळे 10व्या षटकाखेरीस लखनौच्या संघाची धावसंख्या 4 बाद 47 अशी होती.