अध्यात्म-भविष्य

Guru Purnima 2023 : गुरु पौर्णिमा कधीयं? तारीख, शुभ वेळ आणि पूजा पद्धत जाणून घ्या

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग होत आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Guru Purnima 2023 : आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी सोमवारी साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान मिळू शकते, असे ज्योतिषी सांगतात. या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.

हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. गुरूचे स्थान श्रेष्ठ असे मानले जाते. गुरू हा देवापेक्षाही वरचा आहे. कारण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवणारा गुरुच असतो. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग होत आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग.

गुरु पौर्णिमेचा मुहूर्त

गुरु पौर्णिमा 2 जुलै रोजी रात्री 8:21 वाजेपासून सुरू होते. आणि गुरुपौर्णिमा पूर्णता 3 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजून 8 वाजेप्रर्यंत संपेल.

गुरु पौर्णिमेचे महत्व

महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. सनातन धर्मात महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय 18 पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते.

गुरु पौर्णिमा शुभ योग

यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे. ब्रह्मयोग 2 जुलै रोजी संध्याकाळी 7.26 ते 3 जुलै दुपारी 3.45 मिनिटांनी असेल. इंद्र योग 3 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजता सुरू होईल आणि 4 जुलै रोजी सकाळी 11.50 वाजता समाप्त होईल.

गुरु पौर्णिमा पूजन पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर पूजेचे व्रत घ्या आणि स्वच्छ ठिकाणी पांढरे वस्त्र पसरून व्यासपीठ बांधा. यानंतर त्यावर गुरु व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यांना चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा. गुरु व्यासांसोबतच शुक्रदेव आणि शंकराचार्य इत्यादी गुरुंना बोलावून "गुरुपरंपरसिद्धयर्थं व्यासपूजन करिष्ये" या मंत्राचा जप करा.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा