आरोग्य मंत्रा

शुगरच्या तसेच गुडघेदुखीच्या त्रासावर रामबाण उपाय! घरच्याघरी बनवा ‘या’ बीयांपासून पौष्टिक शुगर फ्री लाडू

आजकाल लहान वयात शुगर, गुडघेदुखी तसेच इतर आरोग्यासंबंधित आजार उद्धवतात. आरोग्यासंबंधित समस्यांवर पौष्टिक पदार्थांसोबतच अशा काही पौष्टिक बिया आहेत.

Published by : Team Lokshahi

आजकाल लहान वयात शुगर, गुडघेदुखी तसेच इतर आरोग्यासंबंधित आजार उद्धवतात. आरोग्यासंबंधित समस्यांवर पौष्टिक पदार्थांसोबतच अशा काही पौष्टिक बिया आहेत. ज्या हाडं ठिसूळ होणे, केस गळती, गुडघेदुखी आणि शुगर या समस्यांवर जबरदस्त उपाय म्हणून लागू होईल.

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम जास्त प्रमाणात आढळते. जे हाडं मजबूत होण्यासाठी मदत करतात. तसेच सुर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी यांचे समावेश असते. तर अळशीच्या बियांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे समाविष्ट असतात. जे हृदयविकाराच्या समस्या आपल्यापासून लांब ठेवतात.

पौष्टिक शुगर फ्री लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

भोपळ्याच्या बिया

सुर्यफुलाच्या बिया

अळशीच्या बिया

तूप

वेलची पूड

गुळ

नाचणीचे पीठ

पौष्टिक शुगर फ्री लाडू बनवण्याची कृती:

एका कढईत भोपळ्याच्या बिया, सुर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया एक-एक करून भाजून घ्या. यानंतर अर्धा कप पांढरे तीळ भाजून घ्या. नंतर सर्व भाजलेले घटक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. नंतर कढईत तूप घेऊन त्यात नाचणीचे पीठ भाजून घ्या. यानंतर तूपामध्ये भाजलेल्या नाचणीचे पीठामध्ये बीयांची बारीक केलेली पूड टाका.

कढईत पून्हा तूप घेऊन त्यात गुळ किसून खजूरची पेस्ट घालून बीयांच्या तयार केलेल्या पीठात मिक्स करा. यानंतर वेलची पूड टाकून सर्व मिश्रण एकत्रित करा आणि त्याचे छान गोल आकारात लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे पौष्टिक शुगर फ्री लाडूचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

Maharashtra : स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्राला 10 पुरस्कार

Abhijeet Khandkekar : "'चला हवा येऊ द्या' नवीन पर्वासाठी सुत्रसंचालन करत आहे, ते ही माझ्या शैलीत", अभिजीत खांडकेकरची पहिली प्रतिक्रिया

Pune : पुण्यात परदेशी महिलेकडून साडेसात कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त