आरोग्य मंत्रा

हिरड्या सैल होऊन त्यातून रक्त येतं का? मग यावर उपाय काय जाणून घ्या...

मुखाचं आरोग्य म्हणजे हिरड्या, दात, जीभ हे सर्व अवयव स्वच्छ, शुद्ध आणि निरोगी असणं हे खूप आवश्यक असतं. पायोरिया म्हणजे हिरड्यांमधून पू येणं, रक्त येणं यासाठी उपाय सांगा. दात हलतात यासाठीही उपाय काय?

Published by : Team Lokshahi

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

पायोरिया म्हणजे हिरड्यांमधून पू येणं, रक्त येणं यासाठी उपाय सांगा. दात हलतात यासाठीही उपाय काय? मुखाचं आरोग्य म्हणजे हिरड्या, दात, जीभ हे सर्व अवयव स्वच्छ, शुद्ध आणि निरोगी असणं हे खूप आवश्यक असतं. कारण सेवन केलेला सर्व आहार मुखावाटेच पोटात जाणार असतो. हिरड्या सैल होणं, त्यातून पू येणं, रक्त येणं या सर्व तक्रारी शरीरात वाढलेल्या पित्ताशी आणि रक्तदोषाशी संबंधित असतात.

त्यामुळे यावर पोटात प्रवाळ पंचामृत या पित्तशामक गोळ्या घेण्याचा उपयोग होईल. याशिवाय आपण विडा तयार करताना वापरतो त्या काताचं चूर्ण, तुरटी बारीक करून तयार केलेलं चूर्ण सम प्रमाणात एकत्रीत करून ठेवावं. यातील दोन-तीन चिमूट मिश्रण मधात मिसळावं आणि याचा लेप हिरड्यांवर लावावा. दिवसातून तीन-चार वेळा हा उपाय केल्यानी तुम्हाला बरं वाटेल.

तेल ओढणे हा उपाय सुद्धा. पायोरियावर निश्चित उपयोगी पडतो असा अनुभव आहे. ईरीमेदादी नावाचं तेल बाजारात उपलब्ध असतं. एक चमचा तेल आणि चार ते पाच चमचे पाणी हे मिश्रण सात-आठ मिनिटांसाठी तोंडात धरून ठेवावं, अधून मधून स्क्विश करावं व नंतर थुंकून टाकावं. रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी किंवा नंतर असं तेल ओढणे जर केलं, तर मुखाशी संबंधित बहुतेक सगळ्या तक्रारींमध्ये आराम मिळताना दिसतो.

याशिवाय आहारात लिंबाचा नियमितपणे वापर करणं, टूथ पेस्ट ऐवजी आयुर्वेदिक दंतमंजनाचा वापर करणं, टूथ पेस्ट फार कडक नाही नाहे पाहणं सुद्धा आवश्यक. विश्वनाथजी, या उपायानी तुम्हाला बरं वाटेलच, अन्यथा प्रत्यक्ष सल्ला घेणे कधीही चांगलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा