आरोग्य मंत्रा

सुपरफूड आहे लसूण; जाणून घ्या 'हे' आठ जबरदस्त फायदे

लसूण हे केवळ भाज्यांची चव वाढवण्यासाठी प्रसिद्ध नाही, तर आयुर्वेदात लसणाला आरोग्यासाठी सुपर फूड म्हटले गेले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Garlic Benefits : लसूण हे केवळ भाज्यांची चव वाढवण्यासाठी प्रसिद्ध नाही, तर आयुर्वेदात लसणाला आरोग्यासाठी सुपर फूड म्हटले गेले आहे. लसणाच्या छोट्या पाकळ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि अनेक आजारांपासून दूर राहता येते. अ, ब, क जीवनसत्त्वे लसणाच्या पानात भरपूर लोहासोबत आढळतात. याशिवाय शरीरासाठी आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शियम देखील लसणाच्या पानांमध्ये असते.

लसणाचे फायदे

1. शरीरात साठलेले खराब कोलेस्ट्रॉल लसणाच्या सेवनाने कमी करता येते. रक्तातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या खराब कोलेस्टेरॉलमुळे उच्च बीपी आणि नंतर हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. परंतु लसणाचे रोज सेवन केल्यास हे कोलेस्टेरॉल वितळते आणि शरीरातून बाहेर पडते.

2. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात लसूण मोठे फायदेशीर आहे. कच्च्या लसणाच्या दोन पाकळ्या दिवसातून चघळल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते. यामुळे विषाणूजन्य ताप, सर्दी यांसारख्या मौसमी आजारांचे आक्रमण शरीरावर होत नाही. यासोबतच कच्चा लसूण बाहेरील बॅक्टेरियांना दूर ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.

3. कच्च्या लसणात आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरात जातात आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. ज्यामुळे मेंदूचा कार्यक्षणता सुधारते आणि अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या स्मृती रोगांचा धोका कमी होतो.

4. थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी कच्च्या लसणाचे गुणधर्म खूप उपयुक्त आहेत. कच्चा लसूण क्रीडापटू किंवा अधिक व्यायाम करणाऱ्या लोकांची क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त मानला जातो.

5. हाडे मजबूत करण्यातही कच्च्या लसणाचा मोठा हात असतो. कच्च्या लसणाच्या सेवनाने महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात.

6. कच्च्या लसणात आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म सांधे आणि स्नायू दुखणे दूर करण्याचे काम करतात. विशेषत: संधिवात आणि ऑस्टिओपोरोसिसमुळे होणारे सांधेदुखी दूर करण्यासाठी लसूण तेल देखील खूप प्रभावी आहे.

७. भाजलेल्या लसणाच्या कळ्या रोज खाल्ल्याने पुरुषांची शारीरिक शक्ती आणि स्टॅमिना वाढतो. यासाठी लसणाच्या कळ्या देशी तुपात तळून सेवन कराव्यात.

8. पोटाच्या आजारांवरही लसूण हे एक उत्तम आयुर्वेदिक औषध आहे. याच्या सेवनाने चयापचय वाढतो आणि पोटाशी संबंधित समस्या जसे की अपचन, पेटके, अ‍ॅसिडिटी इत्यादींमध्ये खूप आराम मिळतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?