आरोग्य मंत्रा

COVID Variant JN.1 : नवा कोरोना किती धोकादायक? जाणून घ्या त्याबद्दल सर्वकाही

आपण कोरोनामुक्त झालो आहोत, असे वाटत असतानाच कोरोना पुन्हा नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराने लोकांची झोप उडवली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

COVID Variant JN.1 : कोरोना व्हायरसने गेल्या काही वर्षांत त्याचे अनेक रूप बदलले आहेत. आपण कोरोनामुक्त झालो आहोत, असे वाटत असतानाच कोरोना पुन्हा नव्या रूपात आपल्यासमोर आला आहे. आता पुन्हा एकदा कोरोना JN.1 च्या नवीन प्रकाराने लोकांची झोप उडवली आहे.

कोरोना JN.1 या नवीन स्ट्रेनने जगभरात दहशत निर्माण केली आहे. यापूर्वी चीन, अमेरिका, सिंगापूरमध्ये प्रकरणे नोंदवली गेली होती, परंतु आता भारतातही प्रकरणे आढळून येत आहेत. भारतातील केरळ राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रतही नवा स्ट्रेन आढळून येत आहेत. आरोग्य मंत्रालयही या मुद्द्यावर बैठका घेत आहे. आता प्रश्न पडतो की कोरोनाचे हे नवीन रूप धोकादायक आहे का?

कोरोना JN.1 चे नवीन रूप किती प्राणघातक आहे?

कोरोनाचे नवीन प्रकार जेएन.१ उपप्रकार आहे. याची ओळख पहिल्यांदा लक्झेंबर्गमध्ये झाली. हे कोरोनाच्या पिरोला प्रकाराचे वंशज आहे (BA.2.85). जे ऑमिक्रॉनच्या सर्व प्रकारांनी बनलेले आहे. कोरोना प्रकारांमध्ये उत्परिवर्तन खूप जास्त आहे. जे खूप त्रासाचे कारण आहे. हे स्पाइक प्रोटीनमध्ये बदल करते ज्यामुळे लोकांना खूप लवकर संसर्ग होतो.

कोरोनाच्या नवीन प्रकार JN.1 ची लक्षणे काय आहेत?

केरळमधील 78 वर्षीय महिलेला जेएन.1 प्रकाराचे निदान झाले होते तेव्हा त्यांना सौम्य इन्फ्लूएंझा आजाराची लक्षणे होती. यासोबतच घसा खवखवणे, नाक वाहणे, डोकेदुखी, ताप अशी लक्षणे दिसून आली. काही प्रकरणांमध्ये, सौम्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसारखी लक्षणे नोंदवली गेली आहेत.

संरक्षण कसे करावे?

मुंबईच्या डॉ. दक्षा शाह यांनी म्हंटले की, सर्दी, खोकला, ताप असेल तर स्वतः हुन गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. मास्क स्वतः इच्छेने वापरू शकतात. ज्यांना हाय रिस्क आहे त्यांनी दुर्लक्ष करू नये. जवळच्या महानगर पालिका रुग्णालयात जाऊन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, आपल्याकडील कोरोनावरील लस सर्वच व्हेरियंटवर इफेक्टीव्ह असल्याची सध्या माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा