कोथिंबीरच्या पानांमध्ये व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ब यांच प्रमाण भरपूर आहे. त्याचा आपल्या शरीराल खूप फायदा होतो. चवीसाठी किंवा एखाद्या पदार्थाच्या सजावटीसाठी आपण कोथिंबीचा वापर करतो. डोळ्यांची आग होत असेल, डोळ्यांखाली काळी वर्तुळं निर्माण झाली असतील तर अशा विकारांमध्ये कोथिंबीर गुणकारी आहे.
रोज सकाळी कोथिंबीरीची 10-12 पानं आणि पुदीन्याची 7-8 पानं पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्यावं. याचा आरोग्याला खूप फायदा होतो. कोथिंबीरीची चटणी शरीरासाठी खूप गुणकारी असते. पोटातील समस्यापासून त्याने आराम मिळतो.
कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने, त्वचेवर पुरळ आणि त्वचारोग यांसारखे आजार दूर राहतात. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांसाठी कोथिंबीरचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते.