डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे
पूर्वीच्या काळी घरोघरी कुलर आणि एअर कंडिशनर नव्हते, तेव्हा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, म्हणून वाळ्याचा वापर केला जात होता. दुपारच्या वेळेस घराच्या मुख्य दाराला पाणी मारलेला वाळ्याचा पडदा लावल्याने संपूर्ण घर थंड, शांत आणि सुगंधी राहते. सध्या आपल्याला एअर कंडिशनर लावला की विजेच्या बिलाची चिंता राहते. वाळ्याच्या मुळ्यांपासून बनवलेली छोटी गड्डी अजूनही अनेक घरातल्या माठामध्ये पाण्यात टाकली जाते. यामुळे पाण्यावर वाळ्याच्या शीतलतेचा संस्कार होते. याशिवाय वाळ्याचा मंद सुगंध लागलेले पाणी प्यायलाही खूप छान वाटते. औषध म्हणून पोटाद्वारे वाळा घेतला जातो. वाळा म्हणजे एक प्रकारचे गवत आहे. त्याची पाने दिसायला गवती चहासारखी दिसतात.
औषधात मात्र वाळ्याची मूळं वापरली जातात. वाळ्यापासून सुगंधी अत्तरही बनवले जाते. हिरव्या रंगाचे हे अत्तर अतिशय सुगंधी असले तरी ते खूप महाग असते. शरीराची आग होत असेल, तर त्यावर वाळ्यासारखं दुसरं उत्तम औषध नाही. आजार कोणताही असो, तापामुळे अंगाचा दाह होत असो किंवा एखाद्या त्वचेच्या रोगामुळे त्वेच्या जळजळ करते. उन्हाच्या किंवा अग्निच्या अतिसंपर्कामुळे शरीराचा दाह होते. यावर एकमेव उपाय म्हणजे एक चमचा वाळ्याचे चुर्ण, थोडे दुध आणि खडीसाखरेसोबत घेतल्याने शरीराची दाह कमी होते.
लघवी करताना आग होत असेल किंवा दुखत असेल, लघवी साफ होत नसेल. तर त्यावर उपाय म्हणजे चमचाभर वाळ्याचं चूर्ण, अर्धा चमचा कुटलेले धणे, आणि चमचाभर अर्धवट कुटलेली बडीशेप दोन कप पाण्यामध्ये टाकून प्यावे. त्यानंतर गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये थोडी खडीसाखर मिसळून प्यावे. हे सर्व केल्याने मूत्र संसर्गाची सर्व लक्षणे दूर होण्यास मदत होते.