आरोग्य मंत्रा

शेवगाच्या शेंगा आरोग्यासाठी आहेत खूपच गुणकारी; जाणून घ्या फायदे

शेवग्याच्या शेंगा आमटी, कढी, पिठल्याची चव वाढवतात.

Published by : Siddhi Naringrekar

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

शेवग्याच्या शेंगा आमटी, कढी, पिठल्याची चव वाढवतात. आपल्या आरोग्यासाठी देखील शेवग्याच्या शेंगा खूप गुणकारी आहेत. शेवग्याच्या शेंगांचे सर्वाधिक उत्पन्न आपल्या भारत देशात होतं, असं दिसून येतं. शेवग्याचं झाड साधारण 25 ते 30 फूट उंच असेत. याची पानं छोटी, फुलं सहसा पांढऱ्या रंगाची असतात पण लाल फुलांचा शेवगा सुद्धा काही ठिकाणी आढळतो. शेवग्याच्या कोवळ्या पानांची आणि फुलांची भाजी काही ठिकाणी केली जाते पण शेवग्याच्या शेंगा सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जातात.

शेवग्याच्या शेंगा विकत घेताना त्या कोवळ्या आहे हे बघून घ्याव्यात. जून शेंगा, विशेषतः जून शेंगेतल्या बिया पित्तदोष वाढणाऱ्या असतात. जून शेंग जाड आणि कडक असते, याउलट कोवळी शेंग बारीक असते. कोवळी शेंग शिजते सुद्धा पटकन आणि चवीलाही छान लागते.

औषधात शेवग्याची पानं, सालं वापरली जातात. पानांचा हा पित्तदोषाचा प्रकोप करणारा ठरू शकतो. त्यामुळे शेवग्याची कोवळी शेंग अधूनमधून आहारात ठेवणं सर्वसामान्यांसाठी शेवग्याची शेंग वातशामक, कफनाशक आणि कृमी (जंत) कमी करणारी असते. रोज सकाळी एक शेवग्याची शेंग शिजवून, त्यावर चवीपुरती, मिरपूड आणि सैंधव मीठ टाकून खावी. 15 दिवसांसाठी रोज अशा प्रकारे शेंग खाल्ली की रात्री झोपण्यापूर्वी साधारण दीड ते दोन चमचे एरंडेल घ्यावं. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट साफ होते आणि जंत पडून जातात. दर तीन महिन्यांनी हा प्रयोग करता येतो.

स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी उशिरा येणं, मासिक पाळीत पोटात किंवा कंबर दुखणं अशा तक्रारींवर सुद्धा कोवळ्या शेंगांचे सूप करून, त्यात अर्धा चमचा जिऱ्याची पूड मिसळून घेण्याचा उपयोग होतो. शेवग्याचे असे अजूनही बरेच औषधी उपयोग असतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Government Websites : सरकारी संकेतस्थळे आता मराठीत होणार

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात