आरोग्य मंत्रा

आलं, लिंबू आणि मध करेल तुमच वाढलेलं वजन कमी करण्यास मदत, कसं ते जाणून घ्या...

वजन कमी करणं शक्य आहे. यासाठी लागतात घरच्याच तीन गोष्टी, आलं, लिंबू आणि मध.

Published by : Team Lokshahi

लठ्ठपणा अर्थात वजन वाढलेलं असलं की त्याचा किती त्रास होतो हे सगळ्यांना माहिती असतं. वजन कमी करण्यासाठी कमी खाल्लं, तर भूक सहन होत नाही, व्यायाम करायचा म्हटलं, तर थकायला होतं, डायटिंग करायचं ठरवलं तर बहुतेक वेळा, तेरड्याचे तीन दिवस, ही गत होते आणि शेवटी कंटाळून सगळंच करायचं थांबवतात. पण उपासमार न करता प्रकृतीप्रमाणे आहाराचे नियोजन केलं, थकवून टाकणाऱ्या आणि घामाच्या धारा वहायला लावणारा व्यायाम न करता सूर्यनमस्कारासारखी सर्वांग सुंदर योगासनं केली, नियमित चालणं ठेवलं, आणि बरोबरीने हा एक साधा उपाय नियमितपणे केला तर वजन कमी करणं शक्य आहे. यासाठी लागतात घरच्याच तीन गोष्टी, आलं, लिंबू आणि मध

सकाळी उठल्यावर ब्रश वगैरे करून झालं की १ कप कोमट पाणी घ्यावं. कोमट म्हणजे असं पाणी की ज्याला आपण अगदी सहजपणे स्पर्श करू शकतो. फार गरम किंवा कढत पाणी या उपायामध्ये आपल्याला वापरायचं नाही. त्यामुळे कोमट पाणी घ्यावं, यात एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध मिसळावा. चमच्यानीहलवून एकजीव मिश्रण तयार झालं की अनशापोटी पिऊन टाकावं.

नियमितपणे ही उपाय केली तर त्यामुळे वजन तर कमी होतंच पण पचन सुधारतं, शरीरातील जडपणा कमी होतो, उलट उत्साह वाढतो, अपचनाशी संबंधित सर्व तक्रारींमध्येही आराम मिळतो. चला तर, ज्यांना ज्यांना वजनाची समस्या भेडसावतीये किंवा ज्यांना वजन वाढण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी लगेच हा उपचार सुरू करा आणि आपला अनुभव आम्हाला नक्की कळवा. आरोग्यरक्षणकरणाऱ्या अशा साध्या, सोप्या पण प्रभावी उपाय जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?