आरोग्य मंत्रा

साळीच्या लाह्या नाश्त्याला आहेत खूप फायदेशीर; जाणून घ्या...

प्रत्येक घरात असायलाच हवा असा एक पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या. लोक अनेकदा चुरमुरे आणि साळीच्या लाह्या यात गोंधळतात.

Published by : Dhanshree Shintre

प्रत्येक घरात असायलाच हवा असा एक पदार्थ म्हणजे साळीच्या लाह्या. लोक अनेकदा चुरमुरे आणि साळीच्या लाह्या यात गोंधळतात. पण चुरमुरे म्हणजे, भेळ वगैरे ज्यापासून बनवतात ते, आणि साठेसाळीच्या तांदळापासून बनवलेल्या, आणि सहसा पूजेसाठी वापरल्या जातात, त्या साळीच्या लाह्या. चूरमूरे अगदी साधा आणि पांढरे शुभ्र असतात तर लाह्या थोड्या लालसर आणि पृष्ठभागवर अनियमित असतात.

लाह्या या चवीला गोड, पचायला हलक्या आणि थंड गुणाच्या असतात. अग्नीला प्रदीप्त करतात, ताकद वाढवतात आणि पित्त तसेच कफदोषाला कमी करतात. म्हणूनच ज्यांना वजन वाढू द्यायचं नाही किंवा वाढलेलं वजन कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी साळीच्या लाह्यासारखा दुसरा उत्तम पदार्थ नाही.

सध्या नाश्त्याला अनेक घरात कॉर्नफ्लेक्स आणि दूध घेण्याची पद्धत रूढ झालेली आहे. पण कॉर्न म्हणजे मका वात वाढवणारा असतो. त्यातून त्याचे फ्लेक्स बनवताना ते चपट केले की पचायला अजूनच अवघड होतात. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉर्नफ्लेक्समध्ये चक्क मीठ असतं. त्यामुळे ते दुधाबरोबर मिक्स केलं की विरुद्ध अन्न होतं आणि आयुर्वेदात विरुद्ध अन्न हे अनेक रोगांना आमंत्रण देणारं सांगितलेलं आहे.

पण या अशा कॉर्नफ्लेक्सला उत्तम पर्याय म्हणजे साळीच्या लाह्या. सकाळी नाश्त्यासाठी छान असा एक वाडग्यात घ्यावा. त्यात तुम्हाला हव्या तेवढ्या साळीच्या लाह्या काढाव्यात, चवीनुसार अर्धा ते एक चमचा खडीसाखर टाकावी आणि लाह्या भिजतील एवढं दूध मिसळावं. अशा दूध - लाह्या घेतल्या की पोट तर भरतं पण जड अजिबात होत नाही. शिवाय लाह्या शक्ती देणाऱ्या असल्याने त्यांची ताकद दुपारच्या जेवणापर्यंत टिकून राहते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा