आरोग्य मंत्रा

कांद्याची पात हृदयासाठी फायदेशीर; जाणून घ्या कसा करायचा वापर?

कांद्याची पातीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया कांद्याची पात आपल्या हृदयासाठी इतका उपयुक्त का आहे?

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Spring Onion Benefits : कांद्याची पात ही भाजी कोणत्याही भाजीत घातल्यास चवदार आणि स्वादिष्ट बनते. कांद्याची पात कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. त्यामुळे याचा उपयोग भाज्या सजवण्यासाठीही केला जातो. कारण त्यामुळे भाज्या दिसायला अधिक आकर्षक होतात. कांद्याची पात कोणत्याही वयोगटातील लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. ज्याचा आपण सर्वांनी आपल्या रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. कांद्याची पातीमध्ये असे अनेक पोषक तत्व आढळतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चला जाणून घेऊया कांद्याची पात आपल्या हृदयासाठी इतका उपयुक्त का आहे?

कांद्याची पात हृदयासाठी फायदेशीर

- कांद्याची पातीमध्ये असलेले क्वर्सेटिन हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते जे फ्री रॅडिकल्सशी लढून हृदयरोगांपासून संरक्षण करते.

- यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड, फायबर आणि इतर पोषक घटक आढळतात यामुळे रक्तवाहिन्या निरोगी राहतात.

- कांद्याची पातीचे सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

- यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

- कांद्याची पातीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात यामुळे सूज कमी होते.

- कांद्याची पातीचे नियमित सेवन केल्याने रक्तवाहिन्या लवचिक आणि निरोगी राहतात.

हिरवा कांदा कसा वापरायचा ते जाणून घ्या

सॅलड - कांद्याची पात पातळ कापून सॅलडमध्ये घाला. त्यात टोमॅटो, काकडी आणि लिंबाचा रस घाला.

सँडविच - ब्रेडवर हिरवा कांदा, टोमॅटो आणि इतर भाज्या घालून सँडविच बनवा.

चटणी - कांद्याची पात बारीक चिरून चटणीमध्ये मिसळा.

भाजलेले – कांदे कमी तेलात भाजूनही खाता येतात.

सूप - तुम्ही कांदा आणि इतर भाज्यांचे सूप बनवून ते पिऊ शकता.

रस - कांद्याची पातीचा रस पिणे फायदेशीर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा