आरोग्य मंत्रा

Headache: डोकेदुखी आहे रोजची समस्या? ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश!

आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Published by : Team Lokshahi

अनेकदा डोकेदुखी इतकी वाढते की ना खाणे-पिणे आवडते, ना काही काम करावेसे वाटते. अशावेळी डोकेदुखीच्या समस्येतून आराम मिळवण्यासाठी लोक पेनकिलरचा आधार घेतात. परंतु जास्त पेनकिलर खाणे देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. खरं तर अनेकवेळा डोकेदुखीची अनेक कारणं असतात.

आजच्या काळात डोकेदुखी ही लोकांची सामान्य समस्या बनली आहे. काही वेळा सकाळी उठल्यानंतर काही लोकांना डोकेदुखी सुरू होते. ज्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ राहावे लागते. अनेकदा डोकेदुखी इतकी वाढते की ना खाणे-पिणे आवडते, ना काही काम करावेसे वाटते. अशावेळी डोकेदुखीच्या समस्येतून आराम मिळवण्यासाठी लोक पेनकिलरचा आधार घेतात. परंतु जास्त पेनकिलर खाणे देखील आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. खरं तर अनेकवेळा डोकेदुखीची अनेक कारणं असतात. याचं कारण तुमचं जेवणही असू शकतं. आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे ही डोकेदुखी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. आपल्या आहारात त्यांचा समावेश करण्यास सुरवात करा…

1. सफरचंद

जर तुम्हाला डोकेदुखीची तक्रार असेल तर सफरचंद हा या समस्येवर उपाय आहे. म्हणजेच आपल्या आहारात फळांमध्ये सफरचंदांचा समावेश करा. सफरचंदात पोटॅशियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. अशी फळे किंवा भाज्या तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर डोकेदुखीची समस्या हळूहळू कमी होऊ लागेल. सफरचंदात असलेल्या पोटॅशियममुळे डोकेदुखी दूर होते. त्याचप्रमाणे केळी, जर्दाळू, एवोकॅडो, रास्पबेरी, खरबूज आणि टरबूज देखील खाऊ शकता.

2. दही किंवा ताक

जर तुम्ही दररोज डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर आपल्या आहारात दही किंवा ताक खाण्यास सुरुवात करा. याचे सेवन केल्याने डोकेदुखी दूर होऊ शकते. दही किंवा ताक शरीराला डिहायड्रेट करण्यास मदत करते. ज्यामुळे डोकेदुखी दूर होते. दहीमध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे ते खाल्ल्याने डोकेदुखी दूर होते.

3. नारळाचे पाणी

शरीराला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. अशा वेळी नारळाचे पाणी खूप फायदेशीर ठरते. नारळाचे पाणी प्यायल्याने डोकेदुखीची समस्याही दूर होते. नारळ पाणी हे पोषक तत्वांचे भांडार आहे. यात पोटॅशियम, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन सी असते. यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा