आरोग्य मंत्रा

Benefits Of Neem Leaves : उन्हाळ्यात निरोगी आरोग्यासाठी कडुलिंबाचे 'हे' आहेत औषधी फायदे

उन्हाळ्यात त्वचेचे संक्रमण टाळण्यासाठी कडुलिंबाचे प्रभावी उपाय

Published by : Team Lokshahi

भारतात कडुलिंबाच्या पानांना विशेष महत्त्व आहे. अनेक गोष्टीमध्ये कडुलिंबाच्या पानांचे अनेक गुणधर्म आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. या पानांमध्ये भरपूर पोषकतत्वे असतात, म्हणूनच आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय औषधांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

कडुलिंबाची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. उन्हाळ्यात उष्णता आणि घामामुळे होणाऱ्या त्वेचेचे संक्रमण टाळण्यासाठी कडुलिबांच्या पानांचा वापर केला जातो. कडुलिंबू यकृताला विषमुक्त करण्यास मदत करते, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर काढण्याची क्षमता वाढते. निरोगी यकृत हे चांगले चयापचय, चमकदार त्वचा आणि एकूणच ऊर्जेच्या पातळीसाठी महत्त्वाचे आहे, विशेषत: उन्हाळ्यात कडुलिंब खूप फायदेशीर असते.

कडुलिंबाची पाने रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. त्वचेवरील पुरळ, मुरुमे आणि संसर्ग होऊ शकणारे अशुद्धी काढून टाकतात. सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि उन्हाळ्यात होणाऱ्या मुरुमांपासून बचाव होतो असे मानले जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा