आरोग्य मंत्रा

Health Tips: स्वतःसाठी जगणं – मानसिक आरोग्य आणि समाधानाचा मंत्र

स्वतःसाठी जगणं: मानसिक आरोग्य आणि समाधानाचा मंत्र.

Published by : Riddhi Vanne

आजच्या यंत्रवत आणि धकाधकीच्या जीवनशैलीत आपण सतत काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत धावत असतो. काम, जबाबदाऱ्या, अपेक्षा आणि यशाच्या चढाओढीत अनेकदा सगळ्यांनाच वेळ देतो – पण स्वतःसाठी मात्र वेळच उरत नाही. स्वतःसाठी जगणं म्हणजे केवळ स्वार्थीपणा नव्हे, तर मानसिक आरोग्य, भावनिक समाधान आणि आयुष्याच्या खऱ्या अर्थाने जवळ जाण्याचा मार्ग आहे.

स्वतःसाठी जगणं म्हणजे काय?

स्वतःसाठी जगणं म्हणजे प्रत्येक दिवशी थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं. आपल्याला काय आवडतं, काय नको आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला आनंद देतात आणि कोणत्या गोष्टी त्रासदायक आहेत – याची जाणीव ठेवणं. स्वतःच्या भावना, गरजा, शरीर आणि मन यांच्याशी जुळवून घेणं म्हणजेच 'स्वतःसाठी जगणं'.

"टाईम नाही" हा सर्वसामान्य सबबीचा भंग करा

“मला वेळ नाही,” हे आपण अनेकदा ऐकतो आणि म्हणतोसुद्धा. परंतु एक दिवसातील केवळ १५ ते ३० मिनिटे स्वतःसाठी काढणं खरंच अशक्य आहे का? वेळ मिळवावा लागतो, तो मिळत नसतो. त्यासाठी काही ठोस सवयी अंगीकाराव्या लागतात:

- पहाटेचा वेळ स्वतःसाठी राखून ठेवणे

- सोशल मीडियावर घालवणारा वेळ कमी करणे

- ‘ना’ म्हणण्याचं सामर्थ्य शिकणे

स्व-समाधान कसं मिळवायचं?

1. स्वतःशी प्रामाणिक संवाद - प्रत्येक दिवसाच्या शेवटी ५ मिनिटे स्वतःशी बोला. “आज मी काय शिकलो?”, “काय चुकलं?”, “कशामुळे आनंद मिळाला?” – अशा प्रश्नांमधून आतल्या आवाजाशी संवाद साधता येतो.

2. आभार व्यक्त करणं (Gratitude Practice) - दररोज किमान ३ गोष्टींसाठी आभार मानणं आपल्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम करतं. हळूहळू आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागतो.

3. डिजिटल ब्रेक - सप्ताहातून एक दिवस किंवा काही तास मोबाईल, ई-मेल, सोशल मीडिया पासून पूर्ण ब्रेक घ्या. यामुळे मन शांत होतं आणि खऱ्या आयुष्यातील नात्यांशी नातं घट्ट होतं.

4.स्वतःच्या गरजांकडे लक्ष द्या -

व्यायाम, पुरेशी झोप, आवडीचं वाचन, प्रवास, छंद – हे सगळं आपल्याला आनंद देतं. यासाठी वेळ काढणं म्हणजेच स्वतःच्या आयुष्यात समाधान वाढवणं.

नात्यांमध्येही स्वतःला हरवू नका

आई, वडील, पती/पत्नी, कर्मचारी, मालक, विद्यार्थी... अनेक भूमिका आपण निभावत असतो. पण यामध्ये ‘स्वतः’ हरवू नये. प्रत्येक नात्याच्या बाहेर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्वतःची ओळख जपणं गरजेचं आहे.

स्वतःसाठी जगणं हे स्वतःपासून पळ काढणं नव्हे, तर स्वतःशी मैत्री करणं आहे.

स्वतःला समजून घेणं, वेळ देणं आणि स्वतःच्या आयुष्यात तणावाऐवजी समाधान वाढवणं – हाच खरा अर्थ ‘स्वतःसाठी जगणं’ यामध्ये दडलेला आहे. यामुळे तुम्ही केवळ स्वतःसाठी नव्हे तर

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?