आरोग्य मंत्रा

Health Tips : शरीरामधील उष्णता कमी करण्यासाठी 'हे' सोपे उपाय

उष्णता कमी करण्यासाठी पादाभ्यंग आणि आहारातील बदलांचे महत्व

Published by : Riddhi Vanne

डॉ. नमिता पारेख, डॉ. भाग्यश्री झोपे

शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे पादाभ्यंग करणं. त्रासाची तीव्रता पाहता सध्या रोज एकदा पायाला साजूक तूप लावून शुद्ध काशाच्या साहाय्याने 10 मिनीटे पायाला चोळा. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. रोज रात्री मूठभर साळीच्या लाह्या कपभर पाण्यामधे भिजत घाला आणि सकाळी गाळून घेतलेलं पाणी प्या, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सकाळ - संध्याकाळ कामदुधा आणि प्रवाळपंचामृत या गोळ्या घेणं, सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा प्रमाणात चांगल्या प्रतीचं पंचतिक्त घृत घेणं हे सुद्धा चांगलं. दिवसभरात किमान चार ते पाच चमचे साजूक तूप पोटात जात आहे.

त्यासाठी दुपारचे जेवण 12 साडेबाराच्या दरम्यान, संध्याकाळचं जेवण साडेसात आठच्या दरम्यान करावे. रात्री 11 साडेअकराच्या आसपास झोपावे. हे सुद्धा तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. आहारामध्ये ज्वारी आणि तांदूळ या दोन धान्यांवर अधिक भर देणं चांगलं असते. काही दिवस वरण किंवा आमटीसाठी मुगाचा वापर करणं, वेलावर येणाऱ्या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा, मसालेदार गोष्टी टाळणं हे सुद्धा चांगले असते. चिंचेच्याऐवजी आमसूल किंवा आवळ्याचा वापर करण्याचाही तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा