आरोग्य मंत्रा

Healthy Tips : पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ

आरोग्य टिप्स: पोटाची चरबी कमी करण्यासाठी उकडलेली अंडी आणि दूग्धजन्य पदार्थ खा.

Published by : Team Lokshahi

ज्या लोकांना भूक नियंत्रित करण्यात अडचण येत असेल , तर तुम्ही नेहमी तुमच्या फ्रिजमध्ये उकडलेले अंडी ठेवावित. ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस तुम्ही 2-3 उकडलेली अंडी खावू शकता. फक्त अंड खाण्यापुर्वी अंड्याचा पांढरा भाग खा. त्यातील पिवळा भाग खावू नका. पांढऱ्या भागात कॅलरीजचे प्रमाण कमी असते.

बदलत्या जीवनशैलीमध्ये वाढतं वजन हा बहुतांश लोकांसमोरचा एक मुख्य प्रश्न आहे. कारण प्रत्येकांच्या कामाचे स्वरुप वेगळे असल्याने आपण 8-9 तास एका जागी बसून असतो. त्यामुळे चालणं, फिरणं असा व्यायम आपला होत नाही. याबरोबरच आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदल्यामुळे आपले वजन वाढते. म्हणून वाढत्या वजनामुळे, सुटलेल्या पोटामुळे त्रस्त झाला असाल तर हे पदार्थ खाऊ शकता.

ज्या व्यक्तींना उकडलेली अंडी खायला आवड नाही. त्यांनी दूग्धजन्य पदार्थ घेणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स नसतात. त्यामुळे पोटाची चरबी वाढत नाही. त्यासोबतच तुम्ही दोन किंवा तीन चमचे नैसर्गिक पीनट्स बटर खाऊन भूक भागवू शकता. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालेभाज्या, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हे शरीराला खूप फायदेशीर ठरतात. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होवू शकते. दरम्यान पोट सुद्धा भरलेले राहते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा