आरोग्य मंत्रा

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

गरोदरपणात अनंतमूळाचा हर्बल चहा आणि ओलं खोबरं-खडीसाखर सेवन केल्याने बाळाच्या त्वचेचा रंग तेजस्वी होण्यास मदत होते. जाणून घ्या या उपायांबद्दल अधिक.

Published by : Team Lokshahi

गरोदरपणाचा, नऊ महिने नऊ दिवसांचा काळ, हा आतल्या बाळाची सर्वतोपरीनी काळजी घेण्याचा काळ असतो. या काळामध्ये आई जे काही खाईल, पिईल, इतकच नाही तर तिची जी मानसिकता असेल, त्या सगळ्याचा परिणाम बाळापर्यंत पोहोचत असतो. गर्भसंस्कार म्हणूनच तर उत्तम परिणाम देताना दिसतात. त्वचा आणि रंग हे आरोग्य, सौंदर्य इतकच नाही तर व्यक्तिमत्व घडवणारे घटक. त्वचेचा रंग जरी प्रदेश, हवामान आणि अनुवंशिकतेनुसार ठरत असला तरी त्वचेवर चमक असणं, रंग तेजःपुंज असणं, हे खूप विश्वासार्ह असतं. गर्भ संस्कारांच्या योगे, आपण आपल्या बाळाला सतेज आणि नितळ त्वचेची सर्वोत्तम दान देऊ शकतो असं म्हटलं तर?

यासाठी 2 साध्या गोष्टी करता येतात

एक म्हणजे, गरोदरपणामध्ये रोज एकदा सामान्य चहाच्या ऐवजी अनंत मुळापासून बनवलेला हर्बल चहा घेता येतो आणि दुसरं म्हणजे ओलं खोबरं आणि खडीसाखर आहारात ठेवता येतं. अनंतमूळाचा हर्बल चहा बनवण्यासाठी गॅसवर एक कप पाणी ठेवावं. पाण्याला उकळी फुटली की पाव चमचा अनंत मुळाची भरड टाकावी, वर झाकण ठेवून गॅस बंद करावा. दोन मिनिटांनी गाळून घेउन चहाप्रमाणे प्यावा. अनंतमूळ हे त्वचेसाठी, रंग साठी अप्रतिम असं औषध असतं, याशिवाय ते अत्यंत सुगंधी असल्यानी हाहर्बल चहा लागतोही खूप छान.

बाळाच्या तेजस्वी वर्णासाठी अजून एक सहज करता येण्याजोगा उपाय म्हणजे ओला नारळ किसून किंवा खवून घ्यावा. नैवेद्याची वाटी असते त्या प्रमाणात ओल्या नारळाचा कीस आणि खडीसाखर हे मिश्रण पहिल्या दोन तिमाहीमध्ये म्हणजे सहा महिने गरोदरपणाचत स्त्रीनी सेवन करावं. हे मिश्रण जेवताना घेतलं तरी चालतं किंवा सकाळी घेतलं तरी चालतं. ओलं खोबरं आणि खडीसाखर मज्जा धातूसाठी सुद्धा पोषक असल्यानी बाळाच्या एकंदर बुद्धिमत्तेसाठीही उपयोगी ठरतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा