आरोग्य मंत्रा

मासिक पाळीच्या त्रासावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय, कोणते ते जाणून घ्या...

मासिक पाळीच्या त्रासावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय जाणून घ्या. तांदळाचं धुवण, अशोकाची साल, आणि आहारातील बदलांनी मिळवा आराम.

Published by : Prachi Nate

अनेकांना मासिक पाळीचा त्रास होतो. ज्यात मासिक पाळी आली की 20 दिवस अंगावरून जातं. त्यानंतर मध्ये चार-पाच दिवस गेले की पुन्हा पाळी येते आणि पुन्हा अंगावरून जातं. यावर अनेक उपाय केले तरी त्याचा काही फरक नाही पडत अशावेळी काय कराव जाणून घ्या...

यासाठी घरच्या घरी दिवसातून दोन वेळा तांदळाचं धुवण घेतल्याने तुम्हाला या त्रासातून आराम मिळेल. यासाठी दोन चमचे कच्चे तांदूळ, कपभर पाण्यात पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभर भिजत घालावेत. त्यानंतर सकाळी हातानी कुस्करून पांढर झालेलं पाणी गाळून घेऊन प्यावं. उरलेले तांदूळ स्वयंपाक घरात वापरायला हरकत नाही. 

रस्त्याच्या कडेला उंच सरळ वाढणारा अशोक आणि सीता अशोक ही दोन वेगवेगळी झाडं असतात. सीता अशोक ही वनस्पती गर्भाशयाला ताकद देऊन अशा प्रकारच्या त्रासावर उत्तम परिणाम देणारी आहे. खऱ्या अशोकाची साल मिळाली, तर सहाणेवर थोडं दूध घेऊन त्यात ही साल उगाळून तयार केलेली पेस्ट चमचाभर घेऊन सकाळ संध्याकाळ घेतल्याने देखील तुम्हाला त्याचा उपयोग होईल.

याशिवाय हाता पायाला शुद्ध नैसर्गिक मेंदी लावणे, आहारात साळीच्या लाह्या, मुगाचं वरण-भात, ज्वारीची भाकरी, दुधी, तोंडली, कोहळा, पडवळ, परवर अशा थंड गुणांच्या फळभाज्या, घरी बनवलेले साजूक तूप यांचा अधिकाधिक समावेश करा हे सुद्धा आवश्यक आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी