आरोग्य मंत्रा

रात्री पाय धुवूनच झोपावे; होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेसाठी तुम्ही पाय धुवावेत. यामुळे तुमच्या आरोग्याला मोठे फायदे मिळतात. पाय धुवून झोपण्याचे फायदे जाणून घ्या.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेसाठी तुम्ही पाय धुवावेत. यामुळे तुमच्या आरोग्याला मोठे फायदे मिळतात. माणसाचा पाय हा एकमेव भाग आहे जो शरीराचे संपूर्ण भार सहन करतो. त्यामुळे पायात जडपणा, पेटके आणि वेदना होतात. जर तुम्हालाही अशी समस्या असेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी तुमचे पाय नक्कीच धुवावेत. असे केल्याने तुमच्या सांधेदुखी आणि स्नायूंना खूप आराम मिळेल. पाय धुवून झोपण्याचे फायदे जाणून घ्या.

अ‍ॅथलीटच्या फुटच्या समस्येपासून आराम

ज्या लोकांच्या पायांना जास्त घाम येतो त्यांना हायपरहाइड्रोसिस म्हणतात. अशा व्यक्तीने रात्री झोपण्यापूर्वी पाय धुवावेत. यामुळे तुमच्या पायात बॅक्टेरिया वाढणार नाहीत आणि तुम्ही अ‍ॅथलीटच्या फुटच्या समस्येपासून वाचाल.

आराम मिळेल

दिवसभर व्यस्त जीवनशैली आणि धावपळीमुळे पायांच्या स्नायू आणि हाडांमध्ये वेदना होतात. जर कोणाच्या पायात तीव्र वेदना होत असतील तर त्याने पाय धुवून झोपावे. यामुळे मन शांत लागते तसेच शरीरही रिलॅक्स होते. आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यापूर्वी पाय धुणे चांगले मानले जाते. यामुळे चांगली झोप लागते आणि व्यक्ती तणावमुक्तही राहते.

शरीराचे तापमान राखले जाते

ज्या लोकांना शरिरात इतरांपेक्षा जास्त उष्णता वाटते त्यांनी आपले पाय धुवून झोपावे. रात्री झोपण्यापूर्वी पाय धुतल्याने शरीराचे तापमान संतुलित राहते.

पायाचा वास

दिवसभर मोजे घातल्याने पायाला दुर्गंधी येते, यापासून सुटका हवी असेल तर पाण्यात लिंबू टाकून पाय चांगले धुवावेत.

पाय धुण्याचा 'हा' आहे योग्य मार्ग

आपण आपले पाय थंड, सामान्य किंवा कोमट पाण्याने धुवू शकता. त्यामुळे बादलीत पाणी घ्या आणि त्यात लिंबू टाका. आता त्यात काही वेळ पाय ठेवा. 15 मिनिटे ठेवल्यानंतर, तुमचे पाय बाहेर काढा आणि नंतर ते पूर्णपणे पुसून घ्या आणि त्यावर क्रीम किंवा तेल लावा, यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला