आरोग्य मंत्रा

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

कायाकल्पासाठी तसंच रसायन म्हणून आवळ्यासारखं दुसरं उत्तम फळ मिळणार नाही.

Published by : Team Lokshahi

दीपावली संपता संपता आवळ्याचा हंगाम सुरू होतो पण आयुर्वेदात आणि भारतीय परंपरेत आवळी भोजनाच्या दिवशी आवळ्याच्या वृक्षाचं पूजन करून मगच औषधात आवळा वापरण्यास सुरुवात करण्याची पद्धत असते, कारण या दिवसात मिळणारा आवळा गुणांनी परिपूर्ण असतो. कायाकल्पासाठी तसंच रसायन म्हणून आवळ्यासारखं दुसरं उत्तम फळ मिळणार नाही. म्हणूनच जगप्रसिद्ध च्यवनप्राशमध्ये मुख्य घटक आवळा असतो आणि खरा, चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश हा फक्त नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यातच करून ठेवता येतो.

ताजे आवळे मिळतात त्या दिवसात घरच्या घरी आवळ्यापासून एक अप्रतिम रसायन आपण तयार करू शकतो. आपण याला नाव देऊ या आवळा शॉट. घरातल्या सगळ्या व्यक्ती हा आवळा शॉट घेऊ शकतात. दोन लोकांसाठी जर हा शॉट बनवायचा असेल तर दोन आवळे घ्यावेत. वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्यावे. यानंतर आवळ्याच्या फोडी करून त्या मिक्सरमधून फिरवूनघ्याव्यात. गाळणीच्या मदतीनी आवळ्याचा रस काढावा. आता दोन वाट्यांमध्ये अर्धा अर्धा रस घ्यावा आणि प्रत्येकी एक चमचा तूप, अर्धा चमचा मध तसेच अर्धा चमचा खडीसाखर मिसळावी. चमच्यानी व्यवस्थित मिसळा की झाला आपला आवळा शॉट तयार.

दिवसातून एकदा कधीही हा आवळा शॉट घेता येतो. सलग सात-आठ दिवस नियमितपणे हा शॉट घेतला तर पहिल्यापेक्षा शक्तीत, उत्साहात, एकंदर आरोग्यात सुधारणा होत असल्याचं नक्की जाणवतं. आवळी पूजन कालच झालं. त्यामुळे आवळ्याच्या झाडाला मनापासून नमस्कार करू या आणि पुढचे चार महिने रोज हा आवळा शॉट घेण्याचा निश्चय करूया.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा