आरोग्य मंत्रा

'या' फळाचे नाव माहितीये का? आरोग्यासाठी 'टॉनिक' म्हणून करते काम

देशात फळांच्या अनेक प्रजाती आढळतात. पण असे एक फळ आहे, जे खायला खूप चवदार असते. पोषक तत्वांनी समृद्ध आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Mulberry Fruit Benefits : देशात फळांच्या अनेक प्रजाती आढळतात. आंबा, सफरचंद, संत्री, लिची, केळी, पेरू ही फळे बाजारात उपलब्ध आहेत. पण असे एक फळ आहे, जे खायला खूप चवदार असते. पोषक तत्वांनी समृद्ध आहे. लोकांना खायलाही खूप आवडते. मात्र त्याची बाजारात विक्री होत नाही. या फळाचे नाव आहे तुती किंवा मोरस अल्बा. मोकळ्या शेतात वाढणाऱ्या या झाडाची तुती सामान्यपणे लोकांना खायला आवडते. त्याच्या रंगांबद्दल सांगायचे तर ते कच्चे असताना हिरवे, लाल आणि पिकल्यावर जांभळे दिसते.

पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण

तुती पौष्टिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. व्हिटॅमिन ए, सी आणि ई सोबत लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

तुतीचा एक गुण म्हणजे पचनक्रिया सुधारणे. ज्या लोकांना गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन यासारख्या समस्या आहेत. हे त्यांच्यासाठी टॉनिकचे काम करते. हे पचनसंस्थेतील जळजळ देखील कमी करते.

वृद्धत्वासाठी फायदेशीर

अनेकजण लहान वयातच म्हातारे दिसू लागतात. अशा लोकांसाठी तुती औषधाचे काम करतात. या फळामध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या आणि इतर लक्षणे दिसत नाहीत.

डोळ्यासाठी फायदेशीर

तुती डोळ्यांसाठी औषधाचे काम करतात. जे लोक डोळ्यांच्या कमकुवतपणामुळे त्रस्त आहेत. त्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करतात.

संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त

तुतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. शरीरात संसर्गाविरूद्ध प्रतिपिंड तयार करते. एक्जिमा आणि सोरायसिस सारख्या त्वचेच्या रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. आतड्याच्या कर्करोगातही हे फायदेशीर आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा