आरोग्य मंत्रा

'ही' 5 फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, नाहीतर फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

भाज्यांप्रमाणेच फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ ताजी राहतात, असे काही लोकांना वाटते. मात्र, तसे अजिबात नाही.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Fruits : भाज्यांप्रमाणेच फळे फ्रिजमध्ये ठेवल्याने ती जास्त काळ ताजी राहतात, असे काही लोकांना वाटते. मात्र, तसे अजिबात नाही. फ्रीजमध्ये फक्त काही निवडक फळेच ठेवावीत. फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने बहुतेक फळे खराब होतात किंवा विषारी होऊ शकतात. विशेषत: पल्पी फळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावे. फ्रिजमध्ये फळे ठेवल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. जाणून घ्या कोणती फळे फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

केळी

केळी हे कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नये. केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर काळे होतात. केळीच्या देठातून इथिलीन वायू बाहेर पडतो, त्यामुळे इतर फळे लवकर पिकतात, त्यामुळे केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नये.

टरबूज

उन्हाळ्यात लोक टरबूज खूप खातात. पण हे फळ इतके मोठे आहे की ते एकाच वेळी खाणे कठीण होते. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक टरबूज आणि खरबूज कापून फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु, टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रीजमध्ये ठेवू नये. हे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. तुम्ही त्यांना खाण्यापूर्वी काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता.

सफरचंद

सफरचंद रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतात. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारे सक्रिय एन्झाइम्स. त्यामुळे सफरचंद लवकर पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. जर तुम्हाला सफरचंद जास्त काळ साठवायचे असतील तर ते कागदात गुंडाळून ठेवा. याशिवाय प्लम, चेरी आणि पीच यांसारखी बिया असलेली फळेही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत.

आंबा

आंबा कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका. त्यामुळे आंब्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कमी होऊ लागतात. त्यामुळे आंब्याचे पोषक तत्वही नष्ट होतात. आंबे कार्बाइडने पिकवले जातात, जे पाण्यात मिसळल्यास लवकर खराब होतात.

लिची

उन्हाळ्यात रुचकर लागणारी लिची फ्रीजमध्ये ठेवू नये. लिची रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्याचा वरचा भाग तसाच राहतो, पण आतून लगदा खराब होऊ लागतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन