आजकालचे युग हे डिजिटल युग मानले जाते. अन्न वस्त्र निवारा आणि त्याबरोबर मोबाईल हे जीवनावश्यक वस्तू झाली आहे. आजच्या ऑनलाईन च्या जमान्यात छोट्यातल्या छोट्या सुई पासुन ते मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तु पर्यंत सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन मिळतात. घरबसल्या आता आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी घरबसल्या मागवता येतात. प्रत्यक्ष दुकानात जाऊन वस्तु किंवा भाज्या खरेदी करण्याची परंपरा जणू आजकल कालबाह्य होताना दिसत आहे.
एका क्लिक वर सगळ्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे आणि त्या वस्तूंवर मोठी सूट ही उपलब्ध असल्यामुळे आज अनेक ग्राहकांचा ओढा हा ऑनलाईन शॉपिंग कडे वळलेला दिसतो. सहज उपलब्धतेमुळे दिवसेंदिवस ऑनलाईन ग्राहकांच्या संख्येत वाढच होताना दिसतेय. हे सामान मागविण्यासाठी आजकाल बाजारात फिप्लकार्ट, ब्लिंकिंट , zepto , jiomart. इन्स्टा मार्ट सारखे अनेक अप्लिकेशन सध्या उपलब्ध आहेत.सध्या" 10 मिनिट्स प्रॉडक्ट डिलिव्हरी" ही संकल्पना खूप वायरल होत आहे. त्यामुळे लोकांना काही मिनिटांमध्येच आपल्याला हव्या त्या वस्तु सहज उपलब्ध होत आहेत.
या 10 मिनिटांमध्ये वस्तु आपल्या घरी पोहोचण्यासाठी या प्रत्येक अँप चे एक स्टोरेज सेन्टर त्या त्या एरियामध्ये मध्ये असते आणि त्यायोगे ही डिलिव्हरी केली जाते. मात्र स्टोरेजमध्ये असणारं हे वस्तु खुप दिवसांचे ही असू शकते त्यामुळे त्या खराब होण्याची ही शक्यता असते. त्यामुळं Online पद्धतीनं सामान मागवत असताना त्याची एक्सपायरी डेट नेहमी चेक करा.
तसेच कोणत्या ही वस्तू ऑनलाईन खरेदी करत असताना फ्री ऑफर किंवा एखादी वस्तू फ्री दिली जाते किंवा काही कुपन च्या स्वरूपात ऑफर दिल्या जातात. मात्र त्यामध्ये वस्तू चांगल्या आहेत का नाही याची ही चाचपणी नक्की करा. आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या प्रलोभनांना बळी न पडता योग्य तो निर्णय ग्राहकांनी घेतला पाहिजे.