आरोग्य मंत्रा

तुम्हीही आल्याचा चहा पिण्याचे शौकीन असाल तर जाणून घ्या त्याचे 6 तोटे

आल्याच्या चहाचे नाव ऐकताच चहाची तलफ येते. परंतु, त्याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. अशा परिस्थितीत आल्याचा चहा कोणी पिऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Side Effects Of Ginger : आल्याच्या चहाचे नाव ऐकताच चहाची तलफ येते. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही एक कप आल्याचा चहा घेतला तरी संपूर्ण मूड फ्रेश होतो. आल्याचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मात्र, काही लोकांनी आल्याच्या चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे किंवा करूच नये. कारण त्याचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात. अशा परिस्थितीत आल्याचा चहा कोणी पिऊ नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आल्याचा चहा पिण्याचे तोटे

1. आल्याच्या चहामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात

आल्याचा चहा जास्त प्रमाणात घेतल्यास छातीत जळजळ, गॅस किंवा पोट खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कारण चहामध्ये आलं मिसळल्यास पोटाला हानी पोहोचते.

2. रक्त पातळ करण्याचे गुणधर्म

आल्यामध्ये नैसर्गिकरित्या असे गुणधर्म असतात जे रक्त पातळ करू शकतात. अशा परिस्थितीत रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या घेणाऱ्या लोकांसाठी हा चहा हानिकारक ठरु शकतो. अशा परिस्थितीत या लोकांनी आल्याच्या चहाचे सेवन काळजीपूर्वक करावे किंवा डॉक्टरांना सांगूनच प्यावे.

3. औषधांसह आल्याची अ‍ॅलर्जी

काही औषधांसोबत आल्याचे सेवन केल्यास अ‍ॅलर्जी वाढू शकते. विशेषत: रक्तदाब, मधुमेह, रक्त गोठणे यासारख्या आजारांमध्ये घेतलेल्या औषधांसोबत आल्याचे सेवन केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

4. अ‍ॅलर्जीक प्रतिक्रिया

काही लोकांना आल्याची अ‍ॅलर्जी असू शकते, यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे किंवा सूज येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

5. गरोदर स्त्रिया

गरोदर महिलांनी आल्याच्या चहाचे सेवन कमी प्रमाणात करावे. कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत, आजारांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आल्याचा चहा पिऊ शकता, परंतु त्यापेक्षा जास्त वेळा सेवन करू नका.

6. पित्ताशयाची समस्या वाढवणे

काही संशोधनात असे दिसून आले आहे की आल्याच्या चहाचे सेवन जास्त केल्याने पित्ताची समस्या वाढू शकते. यामुळे जास्त थकवा, झोप न लागणे आणि शरीरात जळजळ होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा