आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे आपला आहार. आपण जर योग्य आहार घेत असून तर आपले शरीर चांगले आणि निरोगी राहिल. सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले काळे हरभरे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
य भिजवलेले हरभरे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यातही उपयुक्त ठरतात. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. पचन सुधारण्यास तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत होते. हरभरे डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
काळे हरभऱ्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. काळे हरभरे खाल्ल्याने अॅनिमियाही बरा होतो. काळ्या हरभरे खाल्लाने भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.